News Flash

“तू मिस वर्ल्ड आहेस म्हणून काय झाल?”; कोरिओग्राफरने प्रियांकावर फेकला होता माईक

जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रियांका चोप्रा ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी प्रियांकाचं ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकात प्रियांकाने तिच्या बालपणापासून बॉलिवूड ते हॉलिवूड तिचा प्रवास कसा होता हे सांगितलं आहे. त्यातलाच एक किस्सा आता समोर आला आहे, एका कॉरिओग्राफरने शूटिंग दरम्यान प्रियांकावर माइक फेकून मारला होता.

‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, “प्रियांका, अक्षय कुमार आणि लारा दत्ता हे त्यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. हे तिघेही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत होते. एका डान्सच्या सिक्वेन्ससाठी प्रियांकाला सेटवर असलेल्या सगळ्यांसोबत डान्सस्टेप मॅच करायच्या होत्या, मात्र तिला ते जमत नव्हते. यामुळे डान्स कोरिओग्राफर राजू खान यांनी रागात त्यांच्या हातात असलेला माइक प्रियांकाच्या दिशेने फेकला आणि तिला ओरडले. ते म्हणाले, तू मिस वर्ल्ड आहेस तर असं समजू नकोस की तू डान्स सुद्धा करू शकतेस. कोणतही काम करण्याआधी ते व्यवस्थित शिकून घेतलं पाहिजे” या शब्दात त्यांनी प्रियांकाला फटकारल्याचं तिनं सांगितलं आहे.

पुढे ती म्हणाली, “यावरून मला, एक नवीन व्यक्ती आणि प्रोफेशनल व्यक्तीत काय फरक असतो हे समजलं. एखादी गोष्ट करताना त्याची पूर्ण तयारी करणं किती गरजेचं असतं हे मला तेव्हा समजलं. तेव्हा मी ठरवलं की, यापुढे सेटवर जाण्याआधी मी पुर्ण तयारी करूनच जाणार.”

आणखी वाचा- 93व्या ऑस्कर नामांकनाची घोषणा, प्रियांका निकची धमाल

पुढे प्रियांका म्हणाली, “आपल्या आठवणी लिहिणे जितके सोपे वाटते तितके सोपे नसते. हे खूप कठीण आहे कारण यामुळे आपल्या जुन्या जखमा उघडल्या जातात. मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजे मी कोणतीही गोष्ट करताना अर्धवट करत नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 1:21 pm

Web Title: priyanka chopra reveals when a choreographer threw mic on her and yelled on the set dcp 98
Next Stories
1 तिचे अनेक रिपोर्ट निगेटिव्ह आलेत, गौहर खानच्या टीमचं स्पष्टीकरण
2 दीपिका, कार्तिकच्या या मौल्यवान गोष्टींवर जान्हवीचा डोळा! काय आहे सत्य?
3 “जेव्हा मी काडीपैलवान होते..,” प्राजक्ता माळीने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा
Just Now!
X