बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा चांगलीच चर्चेत आहे ती म्हणजे ऑप्ररा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीमुळे. या मुलाखतीत प्रियांकाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीबद्दल अनेकांना उत्सुकता होती. प्रियांका या मुलाखतीत नेमक्या कोणत्या गोष्टी उलगडणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर होते.

या मुलाखतीत प्रियांकाने तिचे वडील अशोक चोप्रा तिचे वडील अशोक चोप्रा यांच्या मृत्यूनंतर तिच्यात कसा बदल झाला याबाबत सांगितलं आहे. त्याचसोबत भारतात जडण घडण होत असताना विविध धर्मांचा तिच्या व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव झाला याबद्दलही तिने भाष्य केलंय.

ऑपरा विन्फ्रे यांनी प्रियांकाला या मुलाखतीत देवावरील विश्वासाबाबत एक प्रश्न विचारला होता. तुझा देवावरील विश्वास कधी कमी झालाय का? असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला होता. यावर प्रियांका म्हणाली, “मी माझ्य़ा वडिलांच्या निधनाचा विचार केला कि मला आठवतं. त्यावेळी मला देवाचा खूप राग आला होता. खूप म्हणजे खूप. देवासोबतचं माझं नात काहिसं बदललं. पण त्याचवेळी मला जाणवलं कि देवाने मला वाचवलं आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत केली. पण हो काही काळासाठी माझं त्याच्यासोबत नातं बिघडलं होतं.”

पुढे ती म्हणाली, मी प्रत्येक मंदिरात जायचे. मी शक्य त्या सर्व प्रार्थना केल्या. प्रत्येक गॉडमॅन किंवा गॉडवुमनची भेट घेतली, गरज पडेल त्या प्रत्येक डॉक्टराकडे गेले, वडिलांना घेऊन सिंगापूर, न्यूयॉर्क, युरोप जिथे जाता येईल तिथे त्यांना घेऊन गेले, त्यांच आयुष्य वाढवता येईल यासाठी शक्य ते केलं. ती एक अगदी असाह्हय झाल्याची भावना होती.
ऑपरा यांनी प्रियांकाला तिच्या आध्यात्मिक जडण घडणीविषयी विचारलं. यावर प्रियांकाने म्हणाली, “भारतात आध्यात्मापासून दूर राहणं तसं कठीण आहे. मी एका कॉन्व्हेन्ट शाळेत शिक्षण घेतलंय. त्यामुळे क्रिस्टीएनिटीबद्दल मला जाणून घेता आलं. माझे वडील मशीद गायचे त्यामुळे मला इस्लमा धर्म समजला तर हिंदू कुटुंबात मी वाढली आहे त्यामुळे हिंदू धर्माचे संस्कार माझ्यावर झाले. अध्यात्म हा भारताचा इतका मोठा भाग आहे की आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ” असं ती म्हणाली.

प्रियांका पुढे म्हणाली, ” मी हिंदू आहे. माझ्या घरी मंदिर आहे. मी शक्य तेवढ्यावेळा पूजा अर्चा करते. पण खरं तर मला वाटतं एक मोठी शक्ती आहे जिच्यावर माझा विश्वास आहे.

यासोबतच प्रियांकाने तिचं वडिलांसोबत असलेल्या नात्याबद्दलही या मुलाखतीत सांगितलं आहे.