अभिनेता आर. माधवन एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. माधवनचा पहिला वेब सीरिज ‘ब्रीद’चा Breathe ट्रेलर ‘अॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झाला आहे. या सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी पित्याने केलेल्या संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये मुलाचे पिता डॅनी मास्कारेन्हसची भूमिका माधवन साकारत आहे.

‘अॅमेझॉन प्राइम’वरच हा वेब सीरिज २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. माधवनसोबतच अमित साध, सपना पब्बी आणि बालकलाकार अथर्व विश्वकर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. माधवनच्या डिजीटल डेब्यूसाठी त्याचे चाहतेसुद्धा फारच उत्सुक आहेत. मयांक शर्मा निर्मित ‘ब्रीद’ हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरची सुरुवातच माधवनच्या दमदार संवादाने होते. वाढदिवस साजरा करत असतानाच त्याच्या मुलाची तब्येत अचानक बिघडते. त्यानंतर मुलाला वाचवण्यासाठी एका पित्याचा भावनात्मक संघर्ष सुरु होतो.

PHOTO : शिक्षणव्यवस्थेचा सामना करण्यासाठी इमरान हाश्मी सज्ज

या वेब सीरिजची टक्कर दोन बहुचर्चित चित्रपटांसोबत होणार आहे. कारण २५ जानेवारीला संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ आणि अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.