News Flash

“माझ्या बाजीरावला शोधते”, राखी सावंतचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओत राखीने मस्तानीचा पोशाख परिधान केला आहे.

(Photo Credit : The Khabri Instagram)

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. राखीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. कधी भाजी घ्यायला जाताना ती पीपीई किट घालून जाते तर कधी आणखी काही. आता तर, राखी मस्तानीच्या अवतारात बाहेरल निघाली आहे.

राखीचा हा व्हिडीओ द खबरी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे. राखीचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखीने मस्तानीचा पोशाख परिधान केल्याचे दिसत आहे. एवढंच नाही तर राखी रस्त्यावर फिरत आहे. राखी रस्त्यावर फिरताना बोलते की मी माझं प्रेम शोधते.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Khabri (@realthekhabri)

पुढे राखीने असही म्हटलं आहे. “ना व्हॅक्सिन मिळत आहे, ना कपड्यांचं दुकानं सुर होत आहे. त्यामुळे मी भटकत आहे, ना मुंबई उघडतेय, ना लॉकडाउन हटतोय, मी खूप चिंतेत आहे. ना मी ‘खतरों के खिलाडी’ मध्ये जाऊ शकले, ना मी विवाहीत असून मला माझा पती मिळाला, एक चान्स होता मला माझ्या नवऱ्याला भेटायचा ‘नच बलिए’मध्ये तो शो ही आता बंद होत आहे. आता मी माझ्या नवऱ्याला कशी भेटू. तुम्ही मला मीरा बोला किंवा मस्तानी मी माझ्या बाजीरावला शोधत आहे.”

आणखी वाचा : …यावेळी चुकीच्या माणसाशी पंगा घेतला; केआरकेनं सलमानला दिलं आव्हान

राखीचे असे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात. लॉकडाउन असला तरी राखी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2021 3:07 pm

Web Title: rakhi sawant dressed up as deepika padukones mastani strolls in mumbai streets dcp 98
Next Stories
1 ‘बहुत मर्डर हो रहे है आजकल’, सुनील ग्रोवरच्या ‘सनफ्लॉवर’ सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
2 स्थानिक गावकऱ्यांच्या विरोधामुळे मनोज वाजपेयीच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबले
3 जॅकी श्रॉफ यांनी अनिल कपूरच्या १७ वेळा लगावली होती कानशिलात, जाणून घ्या कारण
Just Now!
X