News Flash

राणा डग्गुबतीला डेट करतेय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री?

एका चॅट शोमध्ये या अभिनेत्रीने अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं.

एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. दाक्षिणात्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही काम करणाऱ्या राणाच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ‘बाहुबली’ चित्रपटात भल्लालदेव जरी देवसेनेच्या प्रेमात असला तरी खऱ्या आयुष्यात राणाची ‘देवसेना’ कोण आहे याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंग व राणा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा असून आता रकुलने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सोफी चौधरीच्या चॅट शोमध्ये रकुलने हजेरी लावली होती. या शोमध्ये तिला पुन्हा एकदा राणाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, ”ओह माय गॉड! आम्ही एकमेकांच्या शेजारी राहतो आणि चांगले मित्र आहोत. मी चित्रपटसृष्टीत करिअर सुरु केल्यापासून तो मला ओळखतो. जेव्हा आमच्याच मैत्री झाली तेव्हा तो एका रिलेशनशिपमध्ये होता.”

आणखी वाचा : ‘पती पत्नी और वो’मधील वैवाहिक बलात्काराच्या संवादासाठी भुमीने मागितली माफी

यावेळी रकुलने तिचं रिलेशनशिप स्टेटससुद्धा स्पष्ट केलं. ”मी माझ्या कामात इतकी व्यग्र असते की अफेअर करायला मला वेळच मिळत नाही. मी सिंगल आहे,” असं तिने सांगितलं. राणा व रकुलच्या मित्रमैत्रिणींचा एक ग्रुपसुद्धा आहे. अनेकदा हे सर्वजण भेटतात व फिरायला जातात.

रकुल ही तेलुगू, तामिळ, हिंदी व कन्नड या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करते. २०१४ मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘यारियाँ’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 3:24 pm

Web Title: rakul preet singh addresses dating rumours with rana daggubati ssv 92
Next Stories
1 चार वर्षांच्या मुलाला शिवी दिल्यामुळे स्वरा भास्कर अडचणीत
2 रोहित शेट्टीने घेतली नवी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!
3 निक जोन्सचा ‘हा’ लूक पाहून प्रियांकाला आली वडिलांची आठवण
Just Now!
X