बॉलिवूड अभिनेत्री रकूल प्रीत सिंग सध्या ‘सरदार का ग्रॅंडसन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी रकुलच्या खऱ्या आयुष्यात घडल्या आहेत. या चित्रपटावर चर्चा करताना रकुलने तिच्या सोबत विमानतळावर घडलेली एक भयानक घटना एका मुलाखतीत सांगितली आहे.

रकुलने ‘नवभारत टाइम्स’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत रकुलने तिच्यासोबत विमानतळावर काय झालं ते सांगितले आहे. “बरेच कलाकार त्यांच्या चित्रपटाशी संबंधित एक गोष्ट आठवण म्हणून आपल्याजवळ ठेवतात, तर तू कधी असे केले का?” असा प्रश्न रकुलला विचारण्यात आला. यावर तिने एक गमतीशीर किस्सा सांगितला. “चित्रपटाची आठवण म्हणून एक गोष्ट मी माझ्याजवळ ठेवली होती. आणि त्यामुळे एक अतिशय भयानक घटना माझ्या सोबत घडली. माझ्या दुसऱ्या चित्रपटात मी जेव्हा पहिल्यांदा बंदुक चालवली तेव्हा मी त्याची डमी बुलेट आठवण म्हणून माझ्या बॅगमध्ये ठेवली आणि ते मी विसरली. सहा-सात महिन्यांनतर मी ती बॅग घेऊन विमानतळावर गेली. तेव्हा मला दिल्ली विमानतळावर थांबविण्यात आलं आणि मला सांगितलं की तुमच्या बॅगेत गोळी आहे. त्यावेळी मला काय झाले ते मी सांगू शकत नाही. मी रडू लागली. हे कसे घडले हे मला समजले नाही. त्यांनी मला पोलिस स्टेशनमध्ये नेले,” असे रकुल म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

पुढे रकुल म्हणाली,” ते मला सारखे विचारत होते की ही बुलेट कुठून आली, आणि मला आठवतचं नव्हतं. मला वाटलं की कोणीतरी माझ्या पर्समध्ये ठेवली आहे. त्यांनी मला चार तास बसवलं, नंतर मला आठवलं. मी त्यांना चित्रपटाचा ट्रेलर दाखवला. त्यानंतर त्यांनी ती बुलेट टेस्टिंगसाठी पाठवली आणि ती डमी असल्याचे त्या टेस्टिंगमध्ये समजले आणि मग माझ्या जीवात जीव आला. आम्ही नंतर खूप हसलो पण मला खूप भीती वाटली. मी तेव्हाच ठरवलं की यापुढे सेटची कोणतीही वस्तू आठवण म्हणून जवळ ठेवणार नाही. माझ्याकडे ‘यारीयां’ या चित्रपटाची आठवण म्हणून माझ्या जवळ त्याचं स्वेटशर्ट आहे आणि दुसऱ्या चित्रपटात हा घोळ झाला, तेव्हापासून मी कोणतीच गोष्ट माझ्याजवळ ठेवली नाही.

आणखी वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेमासाठी केलं धर्म परिवर्तन?

‘सरदार का ग्रॅंडसन’ हा चित्रपट नेटक्लिप्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नीना गुप्ता यांनी ‘सरदार’ची भूमिका साकारली. तर अर्जुन कपूरने त्यांच्या नातवाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अर्जुन आणि नीना गुप्ता यांच्या सोबत रकुल प्रीत सिंह, अदिति राव हैदरी, जॉन अब्राहम, कंवलजीत, कुमुध मिश्रा आणि सोनी राजदान मुख्य भूमिकेत आहेत.