News Flash

‘तख्त’मध्ये रणवीर, विकी साकारणार या ऐतिहासिक भूमिका ?

तख्तमध्ये आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

दिग्दर्शक करण जोहरचा महत्त्वांकाक्षी असा ‘तख्त’ चित्रपट लवकरच येणार आहे. काही दिवसांपूर्वी करणननं या चित्रपटाची घोषणा केली. ‘तख्त’मध्ये रणवीर सिंगपासून ते जान्हवी कपूरपर्यंत अनेक मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे, त्यामुळे या चित्रपटाबद्दल अनेकांना कुतूहल आहे. विशेष म्हणजे या ऐतिहासिक चित्रपटात सेलिब्रिटी कोणत्या भूमिका साकारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. तर यातल्या दोन महत्त्वाच्या भूमिकांवरून नुकताच पडदा उठला  आहे.

या चित्रपटात विकी कौशल मुघल बादशहा औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत. तर रणवीर सिंग दारा शिकोहची भूमिका साकारणार आहे. राजीव मसंद यांच्या ‘अॅन्यूअल अॅक्टर्स राऊंड टेबल’ या कार्यक्रमात गप्पा मारताना रणवीर आणि विकीनं आपल्या भूमिकेवरून पडदा उचलला. मुघल साम्राज्याचा इतिहासात अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेत विकीला पाहायला सगळेच उत्सुक आहे. मात्र अद्यापही करणकडून या संबधीची घोषणा व्हायची आहे.

या चित्रपटात अनिल कपूर शहा जहाँच्या भूमिकेत असल्याचं समजत आहे. ‘तख्त’ मध्ये या अभिनेत्यांसोबतच करिना कपूर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, भूमी पेंडणेकर या देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 4:50 pm

Web Title: ranveer singh viky kaushal to play role in takht
Next Stories
1 अमोल कोल्हेच्या मुलीचं छोट्या पडद्यावर पदार्पण; वडिलांसोबत साकारतेय भूमिका
2 आमिरसोबतच्या नात्याबद्दल फातिमा म्हणते, कुछ तो लोग कहेंगे
3 Flashback 2018 : सुपरहिट सेलिब्रिटींचे सुपरफ्लॉप चित्रपट !
Just Now!
X