21 September 2020

News Flash

सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : वर्षभरात रियाने महेश भट्ट यांना तब्बल इतक्या वेळा केला फोन

रियाने वर्षभरात सुशांतला किती वेळा फोन केला?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची शुक्रवारी ८ तास कसून चौकशी करण्यात आली. यात तिच्या फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले असून वांद्रे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याव्यतिरिक्त रिया अन्य एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या संपर्कात होती.

सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर रिया महेश भट्ट यांच्या संपर्कात होती. तसंच संपूर्ण वर्षभरामध्ये रियाने १६ वेळा महेश भट्ट यांनी फोन केला होता. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर रिया आणि महेश भट्ट यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच २० ते २४ जानेवारी २०२० या कालावधीत रियाने सुशांतला २५ वेळा फोन केला होता. या काळात सुशांत चंदीगढमध्ये त्याच्या बहिणीच्या घरी होता. तर वर्षभरात तिने सुशांतला केवळ १४५ वेळा फोन केला होता.

वाचा : सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : ‘त्या’ घरांच्या खरेदीबाबत रियाचा ईडीसमोर मोठा खुलासा; म्हणाली…

 ‘या’ व्यक्तींच्याही होती संपर्कात

रियाच्या फोन कॉल्स रेकॉर्डनुसार, तिने वर्षभरामध्ये वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी १ हजार १९२ वेळा फोन केला होता.

भाई शौविक चक्रवर्तीला १ हजार ६९ वेळा संपर्क केला.

रिया आणि तिची मॅनेजर श्रुती यांच्याच  ७९१ वेळा फोन झाला होता.

रियाने आई संध्या चक्रवर्ती यांनी ५३७ वेळा फोन केला होता.

सिद्धार्थ पिथानी याच्यासोबत १०० वेळा फोन, तर दिपेश सावंतसोबत ४१ वेळा  संपर्क झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 9:41 am

Web Title: rhea chakrabortys call records show she spoke to filmmaker mahesh bhatt 16 times ssj 93
Next Stories
1 केरळ विमान अपघात : राफेलची जबाबदारी असलेल्या स्क्वॉड्रनमध्ये कार्यरत होते कॅप्टन दीपक साठे
2 ऑगस्ट महिन्यात करोनानं मोडले सर्व विक्रम; जगातील सर्वाधिक रुग्णवाढ भारतात
3 सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : ‘त्या’ घरांच्या खरेदीबाबत रियाचा ईडीसमोर मोठा खुलासा; म्हणाली…
Just Now!
X