12 August 2020

News Flash

‘त्याने प्रपोज केलं पण, नंतर…’; रिचा-अलीची Lovestory

रिचा- अलीची भन्नाट लव्हस्टोरी

बॉलिवूड जगतात दररोज काही ना काही घडतच असतं. अनेक कलाकार, चित्रपटांची गर्दी या साऱ्यामध्ये काही अशी नाती आकाराला येतात, ज्याची कोणी कल्पनाही करत नाही. त्यातलंच एक नातं म्हणजे अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल. फुकरे या चित्रपटानंतर या दोघांमधील प्रेम खुलू लागलं. विशेष म्हणजे ही जोडी एप्रिल महिन्यात लग्नही करणार होते. परंतु लॉकडाउमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. मात्र या काळात त्यांच्याविषयी रोज नवनवीन चर्चा रंगत असतात. त्यातच रिचाने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिची लव्हस्टोरी सांगितली आहे.

“अलीने मालदीवमध्ये रिचाला लग्नाची मागणी घातली. परंतु त्यानंतर जो रंजक किस्सा झाला तो रिचाने ‘ब्राइड्स टुडे’च्या मुलाखतीत सांगितला. अलीने मालदिवमध्ये एक रोमॅण्टीक डिनर प्लॅन केला होता. मला वाटलं कदाचित हे वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सगळं करण्यात आलं आहे. मला कल्पनाही नव्हती की तो मला प्रपोज करणार आहे. आम्ही त्यावेळी आमचं डिनर संपवलं आणि नंतर शॅम्पेनची बाटली उघडली, आणि त्याच क्षणी अलीने मला लग्नाची मागणी घातली”, असं रिचा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “मला प्रपोज केल्यानंतर तो चक्क १० मिनीटं त्या वाळूवर झोपला होता. मला लग्नाची मागणी घालण्यापूर्वी तो प्रचंड टेन्शनमध्ये होता. त्यामुळे मला विचारल्यानंतर त्याने सुटकेचा नि:श्वास सोडून १० मिनीटं तिथेच झोपला”.

दरम्यान, सध्या रिचा आणि अलीची ही लव्हस्टोरी सोशल मीडियावर चांगलीच चर्चिली जात आहे. अली आणि रिचा बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक वेळा विविध चर्चा रंगत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 4:44 pm

Web Title: richa chadha reveals ali fazal took a 10 minutes nap after he proposed richa ssj 93
Next Stories
1 ‘रिलेशनशिप स्टेटस’ विचारणाऱ्या चाहत्याला इलियानाचं भन्नाट उत्तर
2 “…तेव्हा आत्महत्येचाही विचार डोक्यात आला”; करोनाबाधित अभिनेत्रीने सांगितला अनुभव
3 ‘जय हिंद जय भारत’ म्हणत टिक-टॉक स्टार अभिनेत्याने डिलिट केले चिनी अ‍ॅप
Just Now!
X