News Flash

रणवीर सिंग ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत कऱणार काम; साईन केला बिग बजेट चित्रपट

हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल थ्रिलर असणार आहे.

बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांमध्ये अभिनेता रणवीर सिंग याचं नावंही आघाडीवर आहे. तो लवकरच एका मोठ्या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. रणवीरची ही भूमिका त्याच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी असणार हे मात्र निश्चित!

रणवीर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट सध्या करताना दिसत आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांच्या पुढच्या चित्रपटात रणवीर दिसणार आहे. हा चित्रपट सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट ‘अन्नियन’ याचा हिंदी रिमेक असणार आहे. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे. मूळ तमिळ चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता विक्रमने प्रमुख भूमिका साकारली होती.

रणवीरने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तो म्हणतो, “मला ही घोषणा करताना अभिमान वाटत आहे की मी भारतीय सिनेमाच्या एका दूरदर्शी कलाकार शंकरसोबत काम कऱणार आहे. ह्या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते जयंतीलाल गडा करणार आहेत. ”
हा मूळ चित्रपट ‘अपरिचित’ या नावाने हिंदीत डब करण्यात आला होता. याला भारताच्या सर्वच प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तो माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. रणवीरने रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण केलं आहे. हा चित्रपट संदीव कुमारच्या अंगूर या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 11:57 am

Web Title: rranveer singh will work with south director shankar in remake of anniyan vsk 98
Next Stories
1 पार्कमध्ये सुरु होते अभिषेकच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग, पोलिस आले अन्…
2 आयसोलेशनमध्ये असून करोनाची लागण कशी झाली? ‘आशिकी’ फेम राहुलचा सवाल
3 “सेम टू सेम”, मॅचिंग कपड्यांमध्ये दीपिका-रणवीर कुठे निघाले?
Just Now!
X