26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ सिनेमाची प्रदर्शनाआधीच चर्चा रंगू लागली आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं असून सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. यात अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची लाडकी लेक सई मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
‘मेजर’ सिनेमातील सईचा फर्स्ट लूक समोर आला असून चाहत्यांना तिचा हा लूक चागंलाच आवडला आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यात ती शाळेच्या गणवेशात अभिनेता अदिवि शेष याच्या शेजारी बसलेली दिसतेय. यात सई अदिवकडे अत्यंत प्रेमाने पाहत असल्याचं दिसून येतयं. सईच्या या लूकला सोशल मीडियावर मोठी पसंती मिळतेय.
View this post on Instagram
‘मेजर’ सिनेमात मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि त्यांची प्रेयसी असलेल्या ईशाची प्रेम कहाणी देखील पाहायला मिळणार आहे. यात सईच्या लूकसोबतच ईशाने संदीप यांना लिहलेलं एक पत्र पाहायला मिळतंय. ईशाच्या हस्ताक्षरातील या पत्रावरच सई आणि अदिवि यांचा फोटो पाहायला मिळतोय. मेजर संदीप आणि ईशा यांची शालेय दिवसांपासून असलेली मैत्री आणि त्यांचं प्रेम हे शेवटपर्यंत मजबूत होतं.
सिनेमासाठी घेतले तेलगू भाषेचे धडे
या सिनेमात सई 16 वर्षाच्या मुलीपासून 28 वर्षांच्या तरुणीची भूमिका साकारणार आहे. ‘मेजर’ सिनेमा हिंदीसोबतच तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या तेलगू व्हर्जनसाठी सईने तेलगू भाषेचे धडे घेतले. तेलगू सिनेमातील सईच्या संवादांसाठी कोणत्याची व्हाइश ओव्हर आर्टिस्टची मदत घेण्यात आलेली नाही. तेलगू भाषेतील सर्व डायलॉग सईने स्वत: म्हंटले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी सईचं कौतुकही केलं आहे.
कार्तिकसोबत काम केल्यानंतर अमृता सुभाष म्हणाली; त्याच्यासोबत काम करणं म्हणजे…
12 एप्रिलला टीझर प्रदर्शित होणार
‘मेजर’ सिनेमाचा टीझर 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साउथ अभिनेता अदिवि शेष मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तसचं सोभिता धूलिपाला आणि प्रकाश राज हे कलाकारही प्रमुख भूमिकेत झळकतील. तर 2 जुलैला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2021 11:40 am