ग्लॅमरस, हॉट, बोल्ड अंदाज असणाऱ्या सईच्या रुपाची जादू फिल्म इंडस्ट्रीत तर आहेच पण लाखो मुली तिला फॉलो करताना दिसतात. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आग्रहाने घेतलं जातं. ब्रेन वीथ ब्युटी असं परफेक्ट कॉम्बिनेशन सईमध्ये पाहायला मिळतं. तिने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका वेगवेगळ्या शेड्सच्या आणि जॉनरच्या होत्या. ‘तू ही रे’ च्या निमित्ताने देखील आपल्याला एक वेगळीच सई पाहायला मिळणर आहे. छोट्या गावात राहणारी कम्प्लीट देसी गर्ल. तोंडी गावरान भाषा, सोज्वळ स्वभावाची नंदिनी जिला आपला भावी नवरा आपला प्रियकर असावा अशी इच्छा असते. तिच्यावरती चित्रित झालेलं सुंदरा हे गाणं तिच्या रूपाचं आणि गुणांच हुबेहूब वर्णन करणारं आहे. त्याचबरोबर नंदिनी आपल्याला मॉंडर्न, सेशुअस अशा हटके रुपात ‘तू ही रे’ सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. येत्या ४ सप्टेबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2015 रोजी प्रकाशित
‘ग्लॅमरस’ सई बनली ‘देसी गर्ल’
ग्लॅमरस, हॉट, बोल्ड अंदाज असणाऱ्या सईच्या रुपाची जादू फिल्म इंडस्ट्रीत तर आहेच पण लाखो मुली तिला फॉलो करताना दिसतात.

First published on: 27-08-2015 at 08:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar in desi look for upcoming tu hi re