News Flash

…म्हणून सलमानच्या माजी अंगरक्षकाला पोलिसांनी दोरखंडानं पकडलं

अखेर पोलिसांनी 'हा' निर्णय घेतला

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये अनेक जणांवर हल्ला केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानच्या एका माजी अंगरक्षकाला पोलिसांनी पकडलं आहे. विशेष म्हणजे हा अंगरक्षक मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्यामुळे त्याने हे कृत्य केलं असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांना जाळी आणि दोरखंडाचा वापर करावा लागला.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीचं नाव अनस असं असून तो अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक शेराच्या टीममधील एक सदस्य होता. तसंच त्याने मुंबईमध्ये बाऊन्सर म्हणूनही काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनसचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळेच त्याने मुरादाबाद येथील मुगलपुरा पोलीस ठाणे परिसरातील अचानकपणे नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. अनसचं हे वर्तन पाहून अनेकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला सावरणं अशक्य झालं. त्याचवेळी घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अनसला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडणं अशक्य झाल्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दोरखंड आणि जाळीच्या सहाय्याने पकडलं.

दरम्यान,’अनस हा बाऊन्सर मुंबईत काम करत होता. मात्र काही औषधांच्या अतिसेवनामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसत आहे.वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल’,अशी माहिती बरवालान पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस मोहम्मद रशिद खान यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 10:01 am

Web Title: salman khan bouncer anas qureshi caught by moradabad police ssj 93
Next Stories
1 आर. माधवनच्या मुलाची कौतुकास्पद कामगिरी, देशाला मिळवून दिलं रौप्य पदक
2 काळवीट शिकार प्रकरण : कोर्टात सुनावणीपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी
3 कॅप्टन कूल ‘धोनी’ बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?
Just Now!
X