News Flash

लहान मुलांसाठी ‘हे’ आहे सलमानचं नवं गिफ्ट

सलमान त्याच्या प्रोडक्शनच्या माध्यमातून चार वर्षांवरील मुलांसाठी एक सीरिज तयार करणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं माल्टा येथे चित्रीकरण सुरु असून यामध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहता येणार आहे. या चित्रपटानंतर सलमान लगेच त्याच्या आगामी प्रोजेक्टकडे वळणार असून त्याचा हा नवा प्रोजेक्ट लहान मुलांसाठी एक खास गिफ्ट ठरणार आहे.

सलमान एक उत्तम अभिनेत्यासोबतच एक चांगला व्यक्ती असल्याचं अनेकांनी बघितलं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीबरोबर सलमानची सहज मैत्री होतं. विशेष म्हणजे सलमानला लहान मुलं प्रचंड आवडत असून तो त्याचा बराचसा वेळ भाचा आहिलबरोबर घालवत असतो. त्यामुळे त्याला लहान मुले किती आवडतात हे वेगळं सांगायला नको. याच लहान मुलांसाठी तो एक नवी बेवसीरिज घेऊन येणार आहे.

‘डीएनए’नुसार, सलमान त्याच्या प्रोडक्शनच्या माध्यमातून चार वर्षांवरील मुलांसाठी एक सीरिज तयार करणार आहे. विशेष म्हणजे या सीरिजच्या माध्यमातून तो डिजीटल क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सलमान ‘भारत’सोबतच या वेबसीरिजकडे देखील लक्ष देत असून तो या सीरिजच्या तयारीला लागला आहे. यासाठी त्याने काही लेखकांची टीम सुद्धा नेमली आहे.

दरम्यान, सलमानचा ‘भारत’ पुढील वर्षी ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शिनापूर्वीच त्याची जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये कतरिना कैफसोबत तब्बू आणि दिशा पटानी या अभिनेत्री झळकणार आहेत. या चित्रपटानंतर सलमान त्याचं लक्ष या नव्या वेबसीरिजकडे  देणार  असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 9:18 am

Web Title: salman khan to produce kid friendly webseries
Next Stories
1 लुकलुकती गोष्ट!
2 ज्येष्ठांची वेबवाट
3 इथे निवारा ऊनसावली..
Just Now!
X