22 October 2020

News Flash

साराच्या ‘कुली नं.१’ चित्रपटावर मीम्सचा पाऊस

स्टारकिड म्हणून नेटकऱ्यांनी साराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री सारा अली खान आणि वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘कुली नं. १’ चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या चित्रपटावर नेटकऱ्यांनी मीम्सचा पाऊस पडला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला. यूजर्सनी स्टारकिड्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली. दरम्यान आलिया भट्टचा ‘सडक २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या २४ तासांमध्ये तो यूट्यूबवर सर्वाधिक डिसलाइक मिळालेला ट्रेलर ठरला आहे. आता स्टारकिड सारा अली खानचा कुली नं. १ हा चित्रपट प्रदर्शित होणार हे कळताच मीम्स तयार करुन साराल ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या मीम्समध्ये त्यांनी डिसलाइक करण्याविषयी म्हटले आहे.

‘कुली नंबर १’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवनने केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण घराणेशाही या वादमुळे सारा आणि वरुणला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 1:25 pm

Web Title: sara ali khan and varun dhawan coolie no 1 mems are viral avb 95
Next Stories
1 राजस्थानला जाण्यासाठी यूजरने मागितली कार, सोनू सूदने दिले भन्नाट उत्तर
2 “साराने अक्षरश: माझ्यासमोर हात जोडले होते,” रोहित शेट्टीचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
3 अथिया शेट्टीने पोस्ट केला स्वीमसूटमधला फोटो; के. एल. राहुलच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष
Just Now!
X