27 February 2021

News Flash

‘भगवान उठा लो मुझे’; आजारपणाला कंटाळून टीव्ही अभिनेत्याची पोस्ट

मूत्रपिंडे व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आशिष रॉय

‘ससुराल सिमर का’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते आशिष रॉय यांना मूत्रपिंडासंदर्भातील आजार झाल्याने गोरेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मूत्रपिंडे व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांना पुढील काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुकवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो रुग्णालयातील असून आजारपणाला कंटाळून त्यांनी ‘भगवान उठा लो मुझे’ असं लिहिलं होतं.

आशिष यांचा हा फोटो रुग्णालयातील आहे. ‘सकाळची कॉफी.. तीसुद्धा साखरेविना.. माझ्या चेहऱ्यावरील हे हास्य नाइलाजामुळे आहे.. भगवान उठा ले मुझे,’ असं त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. आहे. आशिष हे ५४ वर्षांचे असून ते अविवाहित आहेत. “एकटा राहतो म्हणून सगळं काम स्वत:लाच करावं लागत आहे. आयुष्य हे सहजसोपं नाही”, असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. गेल्या वर्षी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्यानंतर त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा खालावली होती.

१९९७ सालापासून आशिष छोट्या पडद्यावर काम करत आहेत. ‘बनेगी अपनी बात’, ‘जिनी और जुजू’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘ससुराल सिमर का’ या मालिकांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 12:22 pm

Web Title: sasural simar ka actor ashiesh roy hospitalized due to severe renal dysfunction ssv 92
Next Stories
1 अभिनेत्रीची बॅटिंग पाहून युवराज सिंग झाला थक्क; म्हणाला…
2 ‘रणवीर सिंग खोटारडा’; कंगनाच्या बहिणीची टीका
3 स्ट्रीट डान्सर 3D : ‘या’ टिकटॉक स्टारवरुन तयार झाला वरुणचा लूक
Just Now!
X