25 September 2020

News Flash

शिवानी सुर्वे होणार ‘सातारच्या सलमान’ची हिरोइन

या चित्रपटात शिवानी बोल्ड, बिनधास्त मुलीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे

शिवानी सुर्वे

‘बिग बॉस मराठी २’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. बिग बॉसचं विजेतेपद न पटकावतादेखील शिवानी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय झाली. तिच्या याच लोकप्रियतेमुळे ती लवकरच ‘सातारचा सलमान’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.

‘स्वप्नं बघितली तरच खरी होतात !!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘सातारचा सलमान’या चित्रपटामध्ये सुयोग गोऱ्हेची प्रमुख भूमिका असून शिवानी सुर्वे त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांसोबतच ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीवही झळकणार आहे.

काही दिवसापूर्वी ‘सातारच्या सलमान’मधील या दोन्ही अभिनेत्रींच्या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला. या चित्रपटामध्ये शिवानीने दीपिका भोसले या बोल्ड, बिनधास्त मुलीची भूमिका साकारली आहे. तर सायली माधुरी माने या निरागस, सोज्वळ मुलीच्या रुपात पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, प्रकाश सिंघी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमे यांनी केले आहे. हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नाविन्यपूर्ण विषय हाताळले आहेत, त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी धमाकेदार, भन्नाट पाहायला मिळणार, हे नक्की. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 12:10 pm

Web Title: satarcha salman released shivani surve poster marathi movie ssj 93
Next Stories
1 #MeToo : ”काहींनी पैसे स्वीकारून तोंड बंद ठेवलं”; टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
2 अनुष्का- विराटच्या बीच फोटोंवर ‘मान्यवर स्विमवेअर’ म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
3 सुपरहिरो वंडर वुमनसोबत काम करणार बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता…
Just Now!
X