बॉलिवूडमधील खानदानाचा विषय निघाला की सहाजिकच प्रत्येकाला सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील मैत्रीचे मजेदार किस्से आठवतात. काही कारणास्तव एकमेकांशी वैर पत्करलेले हे दोन्ही कलाकार आता एकत्र आले आहेत. बऱ्याच वेळा ते एकमेकांची खिल्लीही उडवताना दिसून येतात. त्यातच सध्या या दोघांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे दोन्ही कलाकार त्यांच्याच मस्तीत दंग होऊन डान्स करत आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका पार्टीमधील असून शाहरुख आणि सलमान ‘टन टना टन’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत अभिनेता वरुण धवन, अनिल कपूर आणि रणवीर सिंगदेखील दिसून येत आहे.
दरम्यान, या काळात अनेक सेलिब्रिटी घरी राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. तर अनेक सेलिब्रिटी त्यांचे थ्रोबॅक फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये रोज या कलाकारांची चर्चा रंगत असते. त्यातच शाहरुख, सलमानचा हा व्हिडीओ चाहत्यांसाठी या लॉकडाउनच्या काळात मनोरंजनाचा विषय ठरत आहे.