News Flash

‘सुपरमून’ पाहून भारावला किंग खान

३० वर्षांपूर्वी 'सुपरमून' या शब्दाचा पहिल्यांदा प्रयोग करण्यात आला होता.

शाहरुख खान

संपूर्ण जगामध्ये सध्या विवध विषयांवर चर्चा सुरु आहे. असे असतानाच गेल्या काही तासांमधअये चर्चेचा विषय म्हणजे सर्वांच्याच नजरा खिळवणारा ‘सुपरमून’. याच सुपरमूनला पाहून अनेकजण भारावले होते. त्यात बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. त्यापैकीच एक आहे किंग खान. अभिनेता शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या सुपरमूनसोबतचे त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसह किंग खानने छानसे कॅप्शनही लिहिले आहे.

या फोटोमध्ये शाहरुख आणि आभाळातील चंद्र स्पष्ट दिसत आहे. अभिनेता शाहरुख खानला अभिनयासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्येही गोडी आहे. त्यामुळे चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुख इतर विषयांविषयीसुद्धा जागरुक असतो हे त्याच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ३० वर्षांपूर्वी सुपरमून या शब्दाचा पहिल्यांदा प्रयोग करण्यात आला होता. या स्थितीमध्ये चंद्र पृथ्वीच्या आगदी जवळ असतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो त्यावेळी त्याचा आकार जास्त मोठा दिसतो. यासोबतच चंद्राचे तेजही जास्त असते. हा अतिशय दुर्मिळ क्षण असून अनेकांनी नुकताच सुपरमून पाहिला. सध्या त्याबाबतच्याच चर्चा सर्वत्र होत आहेत.

दरम्यान, सुपरमूनविषयी ट्विट करणारा अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, कुणाल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. गौरी शिंदे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुख आलियाच्या मेन्टॉरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Next Stories
1 ५००-१०००च्या नोटा रद्द केल्याचा चित्रपटसृष्टीवर काही परिणाम होणार नाही- ओम पुरी
2 ‘माणसं शोध, अभिनेते नको…’
3 ‘ओली की सुकी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X