News Flash

‘पठाण’च्या सेटवरील शाहरुखचे व्हिडीओ लीक, किंग खानचे स्टंट व्हायरल

सोशल मीडियावर चाहत्यांने शेअर केले व्हिडीओ

(photo-screengrab from twitter/instagram video)

बॉलिवूडच्या किंग खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते सध्या आतूर झाले आहेत. यातच सध्या शाहरुख खान त्याचा आगामी ‘पठान’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. दुबईमध्ये ‘पठाण’ सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरु असताना शाहरुखच्या अ‍ॅक्शन सीनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत.

पठाण सिनेमाच्या शूटिंगच्या या व्हिडीओत शाहरुख एका गाडीवर उभं असल्याचं दिसतंय.तसचं चालत्या गाडीवर एका स्टंटमनसोबत तो फाईट करत आहे. या गाडीच्या शेजारुन दुसरी गाडी जात असून गाडीवर असलेल्या ट्रॉलीवर कॅमेरा दिसून येतोय. किंग खानच्या काही फॅन्सनी हे व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. लीक झालेले हे व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

याआधी देखील पठाण सिनेमातील काही सीन लीक झाले होते. या व्हिडीओत शाहरुख जबरदस्त स्टंट करताना दिसून आला होता. एका ट्रकवर या अ‍ॅक्शन सीनंच शूटींग करण्यात आल्याचं दिसून आलं. तर एका व्हिडीओत सर्वाच उंच बुर्ज खलिफा इमारतीसमोर शूटिंग असल्याचं दिसून आलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rehan Shaikh (@rehanshaikh1494)

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसात शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. त्यामुळे ब्रेक नंतर आता शाहरुख पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपटात शाहरुख आणि जॉन ही जोडी पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदूकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 1:08 pm

Web Title: shaharukh khans video leak from pathan shooting in dubai kpw 89
Next Stories
1 ‘रुही’ने केली कोटीत कमाई; तेही पहिल्याच दिवशी!
2 दंगल गर्ल फातिमाचा दमदार डान्स; व्हिडीओ पाहून अनिल कपूर म्हणाले..
3 रील टू रियल हीरो, महेश बाबूमुळे गरीब मुलाला मिळाले जीवनदान
Just Now!
X