बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान गेल्या २५ वर्षांपासून आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करत आहे. प्रेम कसं करावं तर शाहरुखसारखं असंच अनेकदा म्हटलं जातं. शाहरुखशी निगडीत अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्याचे दिवाळी कनेक्शन. शाहरुखचे जास्त करून जे सिनेमे हिट झाले ते बहुतेक सिनेमे दिवाळीच्या काळात प्रदर्शित झाले होते. गेल्या २४ वर्षांपासून त्याची जादू बॉलिवूडमध्ये कायम आहे.

१९९३ मध्ये ‘बाजीगर’ प्रदर्शित झाला
दिवाळीदरम्यान प्रदर्शित होणारा शाहरुखचा ‘बाजीगर’ हा पहिला सिनेमा. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन केले होते. यानंतर दिग्दर्शक आदित्य चोप्राचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी एवढे डोक्यावर घेतले की आजही काही सिनेमागृहात हा सिनेमा दाखवला जातो. या सिनेमाने एक नवीन इतिहास रचला.

१९९७ मध्ये आलेला ‘दिल तो पागल है’
१९९७ मध्ये दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यश चोप्रा यांचा हा सिनेमा सुपरहिट ठरलेला. यानंतर १९९८ मध्ये करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ हा हिट सिनेमाही दिवाळीदरम्यान प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यासोबत दिसला होता. यानंतर २००० मध्ये आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘मोहब्बते’ सिनेमात शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाची कथाही लोकांना फार आवडली होती.

२००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वीर झारा’
फक्त ‘वीर झारा’च नाही तर २००६ ‘डॉन’, २००७ मध्ये आलेला ‘ओम शांती ओम ‘, २०११ मध्ये ‘रा-वन’, २०१३ मध्ये आलेला ‘जब तक है जान’ आणि २०१४ मध्ये आलेला ‘हॅपी न्यू इयर’ हे सगळेच सिनेमे दिवाळीदरम्यान प्रदर्शित करण्यात आले होते आणि हे सारे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.