News Flash

Video: डान्स करता करता शाहरुखने केले काजोलला किस, व्हिडीओ व्हायरल

ते पाहून रोहित शेट्टीला हसू अनावर झाल्याचे दिसत आहे.

बॉलिवूडमधील एक सुपरहिट जोडी म्हणजे अभिनेता शाहरुख खान आणि काजोल. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील केली होती. काजोल आणि शाहरुखच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीपेक्षा त्यांच्यातील मैत्रीच्या नात्याच्या नेहमीच चर्चा सुरु असतात. नुकताच सोशल मीडियावर त्या दोघांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखने चुकून काजोलला किस केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘दिलवाले’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचा आहे. चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण सुरु असते दरम्यान काजोल आणि शाहरुख डान्स करत असतात. डान्स करता करता शाहरुख चुकून काजोलला किस करतो. ते पाहून दिग्दर्शक रोहित शेट्टीला आणि सेटवर उपस्थित असलेल्या लोकांना प्रचंड हसू येते.

शाहरुख आणि काजोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून फिल्म फेअरने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीने ‘दिलवाले’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. काजोल आणि शाहरुखसोबतच अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 4:27 pm

Web Title: shahrukh suddenly kissed kajol and director rohit shetty started laughing avb 95
Next Stories
1 अभिनेत्यावर आली भाजी विकण्याची वेळ, व्हिडीओ व्हायरल
2 शत्रूघ्न सिन्हा यांचा करण जोहरला पाठिंबा, म्हणाले…
3 “असं टॅलेन्ट घराणेशाहीच्या शोरुममध्ये सापडत नाही”; संगीतकाराचा टोला
Just Now!
X