News Flash

शिल्पा शेट्टीने शेअर केली तिची सिक्रेट रेसिपी; फिट राहण्यासाठी आहारात करते ‘या’ पदार्थाचा समावेश

जाणून घ्या, शिल्पाची सिक्रेट रेसिपी

बॉलिवूडची फिट गर्ल शिल्पा शेट्टी हिला फिटनेसचं किती वेड आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. शिल्पा अनेकदा तिच्या योग करतानाचे, वर्कआऊट करतानाचे किंवा खास डाएट रेसिपीचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. यामध्ये शिल्पाने पुन्हा एकदा एक रेसिपी शेअर करत तिच्या फिटनेसचं रहस्य उलगडलं आहे.

शिल्पाने इन्स्टाग्रामवर डोसा करण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा कोणताही साधा डोसा नसून नाचणीचा( रागी) डोसा असल्याचं दिसून येत आहे.


शरीरासाठी आवश्यक असणारे पोषकतत्वे नाचणीमध्ये असतात. हा डोसा चटणी किंवा आपल्याला आवडत असलेल्या कोणत्याही पदार्थासोबत खाता येऊ शकतो, असं कॅप्शन शिल्पाने या डोशाला दिला आहे.

दरम्यान, शिल्पा कायम पौष्टिक आणि सकस आहाराचा जेवणात समावेश करण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकदा ती इतरांनादेखील अशाच काही लहान लहान गोष्टींमधून फिटनेसचे धडे देत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 6:57 pm

Web Title: shilpa shetty easy healthy ragi dosa recipe video dcp 98 ssj 93
Next Stories
1 ‘रेहना है तेरे दिल में’मधील ही जागा मुंबईमध्ये कुठे आहे?, १९ वर्षांनंतर आर माधवनचा खुलासा
2 “अश्लिलता पसरवणं थांबवा”; इरॉसच्या नवरात्री शुभेच्छांवर कंगना संतापली
3 ‘तुझं माझं जमतंय’ मालिकेत दिसणार अभिनेता रोशन विचारे
Just Now!
X