News Flash

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत येणार छोटे शिवबा!

शिवबाची भूमिका साकारण्यासाठी आर्यनने घोडेस्वारी आणि तलवारबाजी यांचे प्रशिक्षण घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे स्वराज्याचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकताना, पाहताना सर्वांचा ऊर अभिमानानं भरून येतो. त्यांचं हे शौर्य आणि जडणघडण यामागे मोठा वाटा आहे तो त्यांच्या आईचा, जिजाऊ माँसाहेबांचा. म्हणूनच त्यांना ‘स्वराज्यजननी जिजामाता’ म्हटलं जातं. सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.

१३ जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जिजाऊंनी स्वराज्याचा सिंह, रयतेचा राजा कसा घडवला याची कथा या मालिकेत मांडली आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी मालिकेतही शिवजन्म झाला आणि स्वराज्यबांधणीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मालिका आता काही वर्षांचा अवकाश घेते आहे. आता आर्यन रवींद्रनाथ लहामगे हा बालकलाकार छोट्या शिवबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी आर्यनने एक होती राजकन्या आणि सावित्रीजोती या मालिकेत अभिनय केला आहे.

शिवबाची भूमिका साकारण्यासाठी आर्यनने घोडेस्वारी आणि तलवारबाजी यांचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचप्रमाणे मिळालेल्या वेळेत त्यानं बरीच पुस्तकंही वाचून काढली आहेत. या मालिकेतून प्रेक्षकांना जिजाऊंचे संस्कार आणि शिवबांची जडणघडण पाहायला मिळणार आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 1:53 pm

Web Title: shivba entry in swarajya janani jijamata serial ssv 92
Next Stories
1 Video : इशा केसकर ‘या’ कारणामुळे सोडतेय ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका
2 DDLJ मधला सीन सुशांतने सारासोबत केला होता रिक्रिएट; व्हिडीओ व्हायरल
3 सुशांत आत्महत्या प्रकरण; संजय लीला भन्साळी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात दाखल
Just Now!
X