अभिनेत्री श्रुती सेठीला नुकतीच एक इमर्जन्सी सर्जरी करावी लागली. श्रुतीने इन्स्टाग्राम स्वत:चा रुग्णालयातील फोटो आणि भलीमोठी पोस्ट लिहित चाहत्यांना याविषयीची माहिती दिली. अचानक तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी सर्जरी करण्याचा सल्ला दिला आणि सर्जरीनंतर तिची तब्येत ठीक असल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं. त्यासोबतच आरोग्याला कधीच गृहीत धरू नका, असं तिने चाहत्यांना सांगितलंय.
‘इमर्जन्सी सर्जरीमुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना २०२० ने चांगलाच धक्का दिला आहे. माझे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सर्व प्लॅन्स मला रद्द करावे लागले. मला जो धडा घ्यायचा होता तो कदाचित मी घेतला नव्हता. म्हणूनच मला आता त्याची शिक्षा मिळतेय. तुम्ही तुमच्या आरोग्याला कधीच गृहीत धरू नका. रोज सकाळी तुम्हाला डोळे उघडून जग बघण्याची संधी मिळतेय आणि रोज रात्री तुम्ही शांत झोपू शकता यासाठी कृतज्ञ राहा’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. त्याचसोबत चाहत्यांना अनेक सल्लेसुद्धा तिने दिले आहेत.
View this post on Instagram
आणखी वाचा : “मी रुग्णालयात दाखल होताच त्याने..”; रेमोने केलं सलमानचं कौतुक
श्रुतीने आतापर्यंत ‘शरारत’, ‘देश मे निकला होगा चांद’, ‘क्यों होता है प्यार’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ या मालिका व शोमध्ये काम केलंय. तिने अल्पावधीतच छोट्या पडद्यावर स्वत:ची ओळख निर्माण केली. याशिवाय तिने ‘राजनिती’, ‘फना’ आणि ‘आगे से राइट’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.