News Flash

लष्करे कुटुंबात थाटामाटात साजरा होणार सिध्दीचा वाढदिवस

शिवाच्या सोबतीने संपूर्ण कुटुंब सिद्धीला एक गोड सरप्राईझ देणार आहेत.

जीव झाला येडापिसा मालिकेतील कथानकात बर्‍याच घटना बघायला मिळत आहेत. आत्याबाईंनी शिवाशी धरलेला अबोला कायम आहे. तर मालिकेमध्ये चंपा नावाचे नवे पात्र आल्याने एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे असे दिसून येत आहे. चंपा आत्याबाईंची बहीण आहे असे तिने सगळ्यांना सांगितले आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी चंपाला माहिती आहेत. शिवा चंपाला आत्याबाईंच्या घरी घेऊन येतो तेव्हा मात्र त्यांच्या तोंडचं पाणी पळतं. हे सगळं घडत असतानाच शिवाच्या सोबतीने संपूर्ण कुटुंब सिद्धीला एक गोड सरप्राईझ देणार आहेत. लष्करे कुटुंबात लाडक्या सिद्धीचा वाढदिवस थाटामाटात साजरा होणार आहे.

शिवा चंपाला लष्करेंच्या घरी आणतो तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो की ही बाई नक्की कोण आहे? आणि तिचा आत्याबाईंशी नक्की काय संबंध आहे? पण जेव्हा सिद्धी या विषयाच्या खोलात जाते तेव्हा शिवा तिला बजावून सांगतो की आत्याबाई ते बघून घेतील. आपला याच्याशी काही एक संबंध नाही.

चंपाचे अचानक रुद्रायतमध्ये येण्याचे कारण काय आहे? यामागे नक्की कोणतं गूढ आहे? हे गूढ सिध्दीला कळेल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या पुढच्या भागात मिळतील. ही मालिका रात्री ८.०० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 4:25 pm

Web Title: siddhi birthday celebration in lashkare family jeev zala yedapisa serial updates ssv 92
Next Stories
1 दाक्षिणात्य अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या; मित्राविरोधात पोलीस तक्रार दाखल
2 मुंबईत पोहोचताच कंगनाची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाली…
3 “करोना सोडून नको त्या विषयांवर चर्चा सुरु आहेत”; उर्मिला मातोंडकरने व्यक्त केली नाराजी
Just Now!
X