News Flash

अजय-सिद्धार्थ येणार एकत्र; देणार सामाजिक संदेश

हे दोघं हा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या ऐतिहासिकपटामुळे सध्या अभिनेता अजय देवगणची जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. अवघ्या सहा दिवसामध्ये या चित्रपटाने १०० कोटी रुपयांची कमाई केली. या सुपरहिट चित्रपटानंतर अजय त्याच्या आगामी चित्रपटाकडे वळला असून या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा स्क्रीन शेअर करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि सिद्धार्थ एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच हे दोघ एकत्र काम करत आहेत. अद्याप या चित्रपटाचं नाव निश्चित झालं नसून या चित्रपटातून विनोदी अंगाने सामाजिक विषय हाताळण्यात येणार आहे.

पाहा: तीन भावंडांच्या बॉलिवूडमधील जोड्या, काही हिट तर काही फ्लॉप!

 लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. सिद्धार्थने या चित्रपटासाठी होकार दिला आहे. तर अजयला चित्रपटाची संकल्पना आवडल्याचंही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अजय सध्या त्याच्या आगामी ‘मैदान’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. तर सिद्धार्थदेखील ‘शेरशाह’मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 1:46 pm

Web Title: sidharath malhotra and ajay devgan soon to share screen in indra kumar next comedy film ssj 93
Next Stories
1 VIDEO : तान्हाजीच्या शूटींगवेळी चुकून निघाला ‘हा’ शब्द; पण दिग्दर्शक म्हणाले…
2 भारताबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावरून सैफ अली खानवर संतापले नेटकरी
3 पद्मिनी कोल्हापुरेंनी ‘प्रवास’निमित्त जपली ही आवड!
Just Now!
X