10 July 2020

News Flash

सिद्धार्थ शुक्लानं पटकावलं ‘बिग बॉस १३’चं जेतेपद

तेरव्या पर्वाच्या अंतिम सोहळा सुरू झाल्यानंतर सर्वात आधी पारस छाब्राने बिग बॉसच्या घरातून पाय काढला

अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं ‘बिग बॉस १३’चं जेतेपद पटकावलं आहे. अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलेल्या सिद्धार्थनं या पर्वात प्रेक्षकांच्या मनातही घर केलं होतं. त्या जोरावरचं त्यानं ‘बिग बॉस’ची ट्रॉफी उंचावली. त्यासोबतच सिद्धार्थला ४० लाख रुपयांच्या रोख बक्षिसाचाही धनी ठरला आहे.

तेरव्या पर्वाच्या अंतिम सोहळा सुरू झाल्यानंतर सर्वात आधी पारस छाब्राने बिग बॉसच्या घरातून पाय काढला. त्यानं सलमान खानची दहा लाखांची ऑफर घेत बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांच्यात अंतिम लढत झाली. शहनाझ गिल, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांनीही बिग बॉसच्या घरातून पाय काढला. अखेर सिद्धार्थ शुक्ला आणि असिम रियाज यांच्यामध्ये बिग बॉसच्या जेतेपदाची लढत झाली. अंतिम निकालासाठी १५ मिनिटांसाठी लाइव्ह व्होटिंग लाइन ओपन करण्यात आली. यामध्ये प्रेक्षकांनी सिद्धार्थच्या पारड्यात भरभरून मते टाकली. प्रेक्षकांच्या मतांच्या जोरावर सिद्धार्थनं जेतेपदावर मोहर उमटवली.

‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळ्याला सलमानच्या होस्टने चार चांद लावले. शिवाय सलमान खानने हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफसोबत सेटवर क्रिकेटही खेळला. सुनिल ग्रोवरच्या कॉमिडीच्या तडक्यानंही प्रेक्षकांचं चांगलेच मनोरंजन झाले.

बिग बॉस १३ ची ट्रॉफी

बिग बॉस १३ ची ट्रॉफी फार सुंदर आहे. ट्रॉफीमध्ये सीझन १३ च्या लोगोप्रमाणे BBचं साइन तयार करण्यात आलं आहे. BB च्या चारही बाजूंना डायमण्ड लावण्यात आले आहेत. तसेच ट्रॉफीला निळ्या रंगाचं बॅकग्राउंड देण्यात आलं आहे. गेल्या सीझनच्या ट्रॉफीपेक्षा १३ व्या सीझनची ट्रॉफी पूर्ण वेगळी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 7:52 am

Web Title: sidharth shukla wins the bigg boss 13 title nck 90
Next Stories
1 साथ प्रेमाची
2 ‘भयपटाबाबतच्या मानसिकतेमध्ये बदल’
3 ऑस्कर फॅशनची न्यारी तऱ्हा!
Just Now!
X