News Flash

डिलिव्हरी बॉयवर भडकली गायिका; तोकड्या कपड्यांच्या टि्वटवर सडेतोड उत्तर

चिन्मयीने त्याच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

देशातील राजकीय आणि सामाजिक घटनांवर बेधडक भूमिका मांडणाऱ्या प्रसिद्ध तमिळ गायिका चिन्मयी श्रीप्पदा यांनी एका स्विगी कर्मचाऱ्यावर सोशल मीडियाव्दारे जोरदार टीका केली आहे. स्विगी कंपनीसाठी काम करणाऱ्या या व्यक्तिने महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्विटचा समाचार घेत चिन्मयीने त्याच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

स्विगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या या व्यक्तिने काही दिवसांपूर्वी महिलांच्या तोकड्या कपड्यांबाबत एक ट्विट केले होते. “कल्पना करा तुम्ही एक डिलिव्हरी बॉय आहात. एखाद्या वस्तुची डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही कोणाच्या तरी घरी गेलात. आणि तेथे तुम्हाला घरातील महिला तोकड्या कपड्यांमध्ये दिसली, तर तुम्ही काय कराल?” असे ट्विट या व्यक्तिने केले होते. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना चिन्मयीने त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

“एखादा व्यक्ति स्वत:च्या घरात वाट्टेल त्या अवतारात राहू शकतो. तुमचे काम केवळ वस्तुची डिलिव्हरी करणे आहे. महिलांनी कुठले कपडे घालावे व कुठले नाही हे सांगणे नाही.” असे सडेतोड उत्तर चिन्मयीने दिले. तिच्या या ट्विटला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. तिच्या मताशी सहमत असलेल्या नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली तर काही जणांनी तिच्यावर टीका देखील केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 6:29 pm

Web Title: singer chinmayi sripada comments on swiggy delivery man mppg 94
Next Stories
1 कंगना करणार राम मंदिरावरील चित्रपटाची निर्मिती
2 गायींचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घालणार स्वेटर; प्रकाश राज म्हणाले…
3 कंगना झाली ट्रोल, नव्या चित्रपटाच्या लूकवरुन नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Just Now!
X