News Flash

‘सिंघम रिटर्न्स’चा फर्स्ट लूक

'सिंघम रिटर्न्स'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.

| July 7, 2014 11:59 am

‘सिंघम रिटर्न्स’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. चित्रपटाचे दोन पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले असून, एका पोस्टरमध्ये चित्रपटातील मुख्य जोडी करिना-अजय दिसत आहे. तर दुस-या पोस्टरमध्ये अॅक्शन हिरो अजय देवगण पहावयास मिळतो. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम’चा सिक्वल असलेल्या ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये अमोल गुप्ते खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. रोहित शेट्टी, अजय देवगण आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंटची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये करिना कपूर पांढरा टॅन्क टॉप, फुललेले केस आणि हिरव्या रंगाचा गॉगल या लूकमध्ये दिसते. तर अजयने भगव्या रंगाचा गॉगल परिधान केला आहे. हिरव्या-भगव्या रंगाचा गॉगल आणि पांढ-या रंगाचे टीशर्ट यामुळे पोस्टरला तिरंग्याची थिम दिल्याचे दिसते.

दुस-या पोस्टरमध्ये मात्र केवळ अजय देवगण दिसतो. चित्रपटाच्या सिक्वलमध्ये अजय पुन्हा एकदा बाजीराव सिंघमचीच भूमिका साकारणार आहे. सीआयडी या टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध चेहरा दयानंद शेट्टीचीही यात झलक दिसते. चित्रपटात त्यानेही मुख्य भूमिका साकारली आहे. रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांप्रमाणे यातही अॅक्शन दृश्यांचा भरणा असेल अशीच अपेक्षा करायला काही हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 11:59 am

Web Title: singham returns first look ajay devgn is back with a roar with belle kareena kapoor
Next Stories
1 अभिनेत्री रसिका जोशी यांचा स्मृतीदिन
2 लग्नसोहळ्यासाठी अॅस्टन कचर आणि मिला कुनीस भारतीय पेहरावात
3 शाहरुख-सलमानचे पुन्हा मनोमिलन!
Just Now!
X