News Flash

कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर सेटवर परतली सोनाली बेंद्रे

इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो

सोनाली बेंद्रे

कर्करोगावर उपचार घेण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे भारतात परतली. सोनालीला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याची माहिती तिने स्वत: दिली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोशल मीडियाद्वारे तिने ही माहिती चाहत्यांना दिली होती. कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर आता सोनाली पुन्हा एकदा कामावर परतली आहे. पुन्हा एकदा लाइट्स, कॅमेरासमोर ती उभी राहण्यास ती सज्ज झाली आहे.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सोनालीने सेटवर परतल्याचं सांगितलं आहे. ‘गेले काही महिने आराम केल्यानंतर सेटवर परतली आहे. विविध पातळ्यांवर विविध प्रकारे मी परीक्षा दिली. हा एक विचित्र अनुभव होता. पण कामावर परतण्याचा आनंदच वेगळा आहे. हा क्षण शब्दांत मांडता येणार नाही. कॅमेऱ्याला पुन्हा एकदा सामोरं जाणं आणि भावभावना पुन्हा जिवंत करणं एक सुंदर अनुभव आहे,’ असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

कॅन्सरशी झुंज देत असतानाही सोनालीने सोशल मीडियावर बरेच प्रेरणादायी आणि काही भावूक पोस्ट शेअर केले. तिची ही यशस्वी झुंज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सोनाली आता ऑनस्क्रीन चाहत्यांना कोणत्या शोच्या माध्यमातून दिसणार हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 4:19 pm

Web Title: sonali bendre back in lights camera and action posts on instagram
Next Stories
1 ‘बाहुबली’मधल्या या अभिनेत्याला मिळाले हॉलिवूडचे तिकीट?
2 ‘उरी’ चित्रपटातील How’s The Josh डायलॉगबाबत विकी कौशल म्हणतो..
3 ‘उरी’चा जोश कायम; २०० कोटी कमाईकडे कूच
Just Now!
X