News Flash

“मुंबई सोडून जायचं नव्हतं पण…”; सनीने सांगितलं लॉकडाउनमध्ये अमेरिकेला जाण्यामागचं कारण

'मदर्स डे'निमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने लॉस एंजिलिसला गेल्याची माहिती दिली.

सनी लिओनी

करोना व्हायरसपासून स्वत:ला आणि मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी अभिनेत्री सनी लिओनी गेल्या महिन्यात भारताबाहेर गेली. ‘मदर्स डे’निमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने लॉस एंजिलिसला गेल्याची माहिती दिली. मात्र तिला मुंबई सोडून जायचं नव्हतं, असं तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाली, “मला मुंबई सोडायची नव्हती. त्यामुळे मला इथे येण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागला. पण डॅनिअलच्या आईसाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय घ्यावा लागला. अशा कठीण काळात कुटुंबीयांसोबत राहणं जास्त महत्त्वाचं आहे.”

लॉस एंजिलिस येथील बंगल्यात सनी व तिचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचं सनीने सांगितलं. त्याचसोबत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होताच भारतात परतणार असल्याचं तिने स्पष्ट केलं. “मला मुंबईची फार आठवण येते. जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होतील, तेव्हा मी परत येईन. डॅनिअल आणि मुलांनाही लवकरात लवकर भारतात परतायचं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 3:37 pm

Web Title: sunny leone wants to return on next flight to india reveals why she left for us during lockdown ssv 92
Next Stories
1 “चार वर्षे काम नव्हतं, जेवायलाही पैसे नव्हते पण तरी..”; रॉनित रॉयचा स्ट्रगल
2 “अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा निषेध करणारे महाराष्ट्रातील साधूंच्या हत्येनंतर शांत का होते?”
3 झी मराठीवर बोलक्या बाहुल्यांची धमाल मालिका
Just Now!
X