News Flash

“दान नकोय आम्हाला काम हवय”; जेष्ठ अभिनेत्री महाराष्ट्र सरकारवर संतापल्या

"६५ वर्षांवरील कलाकारांनाही काम करण्याची परवानगी द्यावी"; जेष्ठ अभिनेत्रीची सरकारकडे मागणी

लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणास सरकारने अखेर परवानगी दिली आहे. परंतु या परवानगीमध्ये सरकारने एक अट घातली आहे. ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगमध्ये भाग घेता येणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या या नियमाविरोधात जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांनी आवाज उठवला आहे. आम्हाला दाम नकोय तर आम्हाला काम हव आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – “मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत”; महेश मांजरेकर संतापले

बॉलिवूड लाईफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सुरेखा सीकरी यांनी सरकारच्या लॉकडाउन नियमांविरोधात आवाज उठवला. त्या म्हणाल्या, “लॉकडाउनमुळे मी नक्कीच आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. ज्या मालिकांमध्ये काम केलं त्यांचे पैसे मला अद्याप मिळालेले नाहीत. परिणामी ही आर्थिक टंचाई उद्भवली आहे. मात्र मला माझ्या समस्यांची जाहीरात करायची नाही. कारण मला कोणाकडूनही दान नकोय मला फक्त काम हवंय. सरकारने ६५ वर्षांवरील कलाकारांसाठी तयार केलेला हा निर्णय चुकीचा आहे. त्यांनी हा नियम त्वरीत रद्द करावा, जेणेकरुन आम्ही जेष्ठ कलाकार देखील काम करुन आपलं पोट भरु शकू.”

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: खरंच रिया चक्रवर्ती फरार आहे का? पाटणा पोलीस म्हणाले…

सुरेखा सीकरी बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. १९७८ साली किस्सा कुर्सीका या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘नसीब’, ‘सरफरोश’, ‘हेरा फेरी’, ‘देवडी’, ‘बधाई हो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. चित्रपटांशिवाय मालिकांमध्येही त्यांनी प्रचंड काम केलं आहे. १९९० साली सांझा ‘चूल्हा’ या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलें होते. त्यानंतर त्यांनी ‘कभी कभी’, ‘बुनियाद’, ‘सीआयडी’, ‘केहना है कुछ हमको’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये त्यांनी काम होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 3:40 pm

Web Title: surekha sikri comment on lockdown rules in maharashtra mppg 94
Next Stories
1 Video : अभिनेता न होण्यामागचे कारण सांगतोय अक्षय इंडीकर
2 “मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत”; महेश मांजरेकर संतापले
3 रिया चक्रवर्तीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X