News Flash

“सुशांत ड्रग्ज घेतो हे कुटुंबीयांना माहिती होते”, रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा

सुशांतच्या बहीण आणि मेहुण्याला तो ड्रग्ज घेतो हे माहित होते. एवढंच नाही तर रियाला भेटण्याआधी पासून सुशांत ड्रग्जचं सेवन करायचा.

(Photo Credit : File Photo)

बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला एक वर्ष होतं आलं आहे. सुशांतशी संबंधीत ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वीच NCB नं सुशांतचा फ्लॅटमेट आणि मित्र सिद्धार्थ पिठानीला या ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. दरम्यान, आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवतीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. रियाच्या म्हणण्यानुसार सुशांतच्या बहीण आणि मेहुण्याला तो ड्रग्ज घेतो हे माहित होते. एवढंच नाही तर रियाला भेटण्याआधी पासून सुशांत ड्रग्जचं सेवन करायचा.

NCB च्या चौकशीत रियाने हा खुलासा केला आहे. “सुशांत त्याची बहीण प्रियांका आणि मेहुणा सिद्धार्थसोबत अमली पदार्थांचे सेवन करणायचा. त्यांच्यासाठी तो अमली पदार्थं देखील आणायचा. सुशांतच्या कुटुंबाला तो अमली पदार्थांचे सेवन करतो हे माहित होते,” असे रिया म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

पुढे रिया म्हणाली, “सुशांतची तब्येत बिघडल्यानंतर माझा भाऊ शौविक त्याला रुग्णालयात घेऊन जाणार होता. मी सुशांतला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण सुशांत त्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आलं नाही. सुशांतला अमली पदार्थाचे व्यसन लागलं आहे हे त्याच्या कुटुंबीयांना चांगल्याप्रकारे माहीत होतं.”

आणखी वाचा : ‘राधे माँ’, यामी गौतमचा लग्नातील ड्रेस पाहून कलाकारांनी उडवली खिल्ली

रियाने सुशांतची बहीण प्रियांकाने दिलेल्या प्रिस्क्रिप्शनबद्दल देखील सांगितले. “८ जून २०२० रोजी प्रियांकाने रियाला व्हॉट्सअॅपवर प्रिस्क्रिप्शन पाठवलं होतं. या प्रिस्क्रिप्शनमध्ये librium 10 mg, nexito सारख्या औषधांचा उल्लेख केला होता. ही औषध NDPS च्या अंतर्गत ड्रग्जमध्ये येतात. प्रिस्क्रिप्शनमध्ये सुशांतला ही औषधं द्यायला सांगितली होती. हे प्रिस्क्रिप्शन सुशांतला न भेटता दिल्ली येथील कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर तरुण यांनी दिलं होतं. दरम्यान, ही औषध रुग्णाची विचारपूस केल्या शिवाय दिली जातं नाही. ८ जून ते १२ जून सुशांतची बहीण मीतू त्याच्यासोबत होती. प्रियांकाने दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये असलेले ड्रग्ज सुशांतच्या निधनाचे कारण असू शकते,” असे रिया म्हणाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 3:41 pm

Web Title: sushant singh rajput death case narcotics control bureau has included written statement of rhea chakraborty in the drug case dcp 98
Next Stories
1 ‘Indian Idol 12’ च्या सेटवर ‘झीनी बेबी’ची एन्ट्री; रिक्रिएट केला १९७९ सालच्या ‘द ग्रेट गॅम्बलर’चा सीन
2 सोनालीने कर्करोगावरील उपचार घेतानाचा जुना फोटो केला ट्वीट; म्हणाली…
3 मार्वल स्टुडिओच्या ‘मिस मार्वल’मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान झळकणार?; नेटकऱ्यांमध्ये चर्चा
Just Now!
X