करोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकाटातून मार्ग काढण्यासाठी जवळपास तीन महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु होता. मात्र आता या लॉकडाउनच्या अटी शिथील करण्यात येत आहेत. त्यामुळे देशाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा हळूहळू सुरुळीत होताना दिसत आहे. यामध्येच आता गेल्या काही महिन्यांपासून घरात अडकलेले सेलिब्रिटीदेखील घराबाहेर पडताना दिसत आहे. यात हृतिक रोशनची एक्स-वाइफ सुझान खानदेखील हेअर स्पा आणि सलूनमध्ये गेल्याचं पाहायला मिळालं सुझानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. विशेष म्हणजे खबरदारी म्हणून तिच्यासाठी अख्ख सॅलॉन रिकामं करण्यात आलं होतं.
जवळपास तीन महिने घरात राहिल्यानंतर सुझान घरातून बाहेर पडली असून तिने प्रथम थेट ब्युटीपार्लर गाठल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे खबरदारी म्हणून तिने चक्क संपूर्ण पार्लर बुक केल्याचं दिसून आलं.
४ महिन्यांनंतर अखेर हेअर कट आणि स्पा ट्रिटमेंट घेण्याचा योग आला. त्यांनी माझ्यासाठी संपूर्ण सलून रिकामं ठेवलं होतं. हे पाहून खरंच आनंद झाला. हा वेळ दिल्यामुळे मनापासून आभार असं म्हणत सुझानने सलूनमधील एक फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, सुझानचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु, या फोटोमध्ये सुझानने लॉकडाउनच्या नियमांचं पुरेपूर पालन केल्याचं दिसून आलं. तसंच तिने चेहऱ्यावर मास्क आणि शिल्डही लावलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 4:27 pm