27 February 2021

News Flash

स्वरा भास्कर चा ‘इट्स नॉट दॅट सिंपल – २ ‘ चा फर्स्ट लूक रिलीज

या हंगामात स्वरा भास्कर मीरा या भूमिकेची पुनर्रचना करणार आहे. हे पात्र काहीसं बोल्ड असेल असेही सांगण्यात येत आहे.

‘वीरे दी वेडिंग’ या गाजलेल्या चित्रपटानंतर स्वरा भास्कर आता तिच्या ‘इट्स नॉट दॅट सिंपल – २ ‘ या वेब सिरीजमधून आपल्या सर्वांसमोर येणार आहे. या शोच्या दुसऱ्या हंगामात स्वराचा सहभाग असेल. या शो मधील स्वराचा पहिला लूक नुकताच समोर आला आहे. यामध्ये स्वरा फोनवर बोलताना अतिशय ग्रेसफूल दिसत आहे. या हंगामात स्वरा भास्कर मीरा या भूमिकेची पुनर्रचना करणार आहे. हे पात्र काहीसं बोल्ड असेल असेही सांगण्यात येत आहे. ही वेबसिरीज दानिश अस्लम याने दिग्दर्शित केली आहे. यामध्ये तिच्यासोबत सुमित व्यासही आपल्याला दिसेल. अभिनेता पुरब कोहलीही या मालिकेत आपल्याला दिसणार आहे. यासोबतच या साहसी कथेत मानसी रच, नेहा चौहान आणि विवान भटेना सारखे कलाकारही यामध्ये सहभागी होणार आहेत.

याबाबत स्वरानेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा शो नेहमी माझ्या पसंतीच्या शों पैकी एक आहे. या दुसऱ्या सीजनचा भाग म्हणून मला खूप आनंद होत आहे. नवीन भागामध्ये मीराची कहाणी किती संघर्षमय असेल हे पाहणं रंजक असेल असं ती म्हणाली. एक व्यक्तिमत्त्व म्हणून मीरा हे पात्र मला खूप मनोरंजक वाटत आणि मी या शो मधून पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्यास खूप उत्सुक आहे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करण्यावर या सीझनने मीराच्या संघर्षावर प्रकाश टाकला आहे. दानिशच्या रुपाने शोला अतिशय चांगला दिग्दर्शकही लाभला आहे. करिअर, कुटुंब, प्रेम, यश आणि स्वातंत्र्य या सर्व टप्प्यांवर स्त्री कशी असते ते दाखविण्याचा प्रयत्न या वेबसिरीजच्या माध्यमातून केला जाणार आहे.

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटानंतर हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे स्वरा चांगलीच ट्रोल झाली होती. बरेच बोल्ड संवाद आणि दृश्यांमुळे हा चित्रपट चर्चेत आला आणि सर्वाधिक वादग्रस्त ठरला. सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला, टिकाटिप्पणी केली. त्यावेळी स्वराने अतिशय सकारात्मक भूमिका मांडली होती. ‘हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे ट्रोलला सामोरं जावं लागणार हे अपेक्षितच होतं. चित्रपटात असं दृश्य दाखवणं अनेकांसाठी धक्कादायक आहे आणि त्यावरून वाट्टेल ते बोलणारे बरेच लोक समाजात आहेत. मी बऱ्याच मुद्द्यांवर मोकळेपणाने माझी मतं मांडते, मग ते राजकीय असो किंवा चित्रपटांविषयी. त्यामुळे हस्तमैथुनाच्या दृश्यावरून माझ्यावर टीका करण्याची संधी लोक सोडणारच नाही हे मला ठाऊक होतं,’ असंही स्वरा पुढे म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 5:00 pm

Web Title: swara bhaskars first look from its not that simple 2 release
Next Stories
1 ‘या’ खास ठिकाणी सुशांतने खरेदी केली आहे जमीन!
2 बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लोक अक्षरश: माझ्या पाया पडायला यायचे- देवदत्त नागे
3 अमृता पाहतेय ‘या’ चित्रपटाची आतुरतेने वाट!
Just Now!
X