आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी करतेय. नुकताच तिने चित्रपटातील फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आकाश खुराना दिग्दर्शित या चित्रपटात तापसी एका धावपटूची भूमिका साकारत आहे. सध्या दुबईत चित्रपटाची शूटिंग सुरू आहे.
या भूमिकेसाठी तापसी खूप मेहनत घेत असून सेटवरही तिच्यासोबत पाच आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ट्रॅक ट्रेनर, अॅथलेटिक्स कोच आणि जिम ट्रेनर अशी टीम असते. या फर्स्ट लूकमध्ये तापसी रनिंग ट्रॅकवर पाठमोरी उभी आहे. आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या एका धावपटूची भूमिका ती साकारतेय.
View this post on Instagram
आणखी वाचा : नोज रिंग आणि काजळ…न्यूड फोटोनंतर पुन्हा एकदा मिलिंद सोमण चर्चेत
तापसीच्या हातात सध्या बरेच प्रोजेक्ट्स असून नुकतंच तिने आनंद एल राय दिग्दर्शित ‘हसीन दिलरुबा’ या रोमॅण्टिक थ्रिलर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर ती ‘लूप लपेटा’, ‘रन लोला रन’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं होतं.