अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप- खुरानाला २०१८ला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं. ताहिराने तिच्या या आजारपणाची माहिती स्वत: सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु करण्यात आलं. ५ जानेवारीला ताहिराची शेवटी किमोथेरपी करण्यात आली होती. या थेरपीपूर्वी ताहिराने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ताहिरा प्रचंड खुश दिसत होती. त्यानंतर ताहिराने पुन्हा तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ताहिराने तिचे पूर्णपणे केस कापल्याचं दिसून येत आहे.
ताहिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ताहिरा खुश आणि आनंदी दिसत असून तिने मुंडण केल्याचं दिसून येत आहे. केमोथेरपीमध्ये रुग्णाला त्याचे केस गमवावे लागतात. थेरपी सुरु असताना रुग्णाचे केस गळत असतात. त्यामुळे ही थेरपी करत असताना ताहिरालाही या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. मात्र केस पूर्णपणे कापल्यानंतरही मी पूर्वीसारखीच खूश आणि आनंदी आहे, असं ताहिराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘नमस्कार, मी ताहिरा कश्यप. हो तिच पूर्वीची ताहिरा, पण नव्या अंदाजात, नव्या रुपात. सततच्या थेरपी आणि तेच तेच डेली रुटीनमुळे कंटाळले होते. त्यामुळे हा नवा लूक केला आहे. माझा हा लूक कसा वाटतोय ते नक्की सांगा’, असं ताहिरा म्हणाली.
Hottie! https://t.co/MMqVPTM9W0
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Ayushmann Khurrana (@ayushmannk) January 16, 2019
पुढे ती असंही म्हणाली, ‘मला माझे सगळे केस कापावे लागतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण ते मी केलं आहे. मात्र तरीही आनंदी आहे’. ताहिराचं हे ट्विट आयुष्मानने रिट्विट करत तिला ‘हॉटी’ असं म्हणत त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही तिला ‘हॉट’ दिसत असल्याचं म्हटलं आहे.
HOT!!! https://t.co/jjc8FLxzev
— Deepika Padukone (@deepikapadukone) January 16, 2019
दरम्यान, ताहिरा कॅन्सरशी लढत असतानादेखील तिने तिच्या आगामी चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये विलंब होऊ नये यासाठी ताहिरा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे केमोथेरपी घेत असतानाच ताहिरा दुसरीकडे चित्रपटाच्या दिग्दर्शनचं काम करत असल्याचं तिच्या घरातल्यांनी सांगितलं.