नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात दिग्दर्शक ओम राऊत यांनी मांडली. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. एकीकडे हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी थिएटरमध्ये खेचत असताना दुसरीकडे यामध्ये दाखवलेल्या इतिहासाबद्दल बरीच मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. चित्रपटात दाखवलेला इतिहास कितपत खरा आहे याबद्दल स्वत: तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनी या विशेष मुलाखतीत सांगितले.
‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने दोन आठवड्यांत कमाईचा २०० कोटींचा आकडा पार केला आहे. अजूनही तिकीटबारीवर प्रेक्षकांची गर्दी सुरूच आहे. ओम राऊत यांना हिंदीच्या पदार्पणाच्या चित्रपटातच मोठं यश मिळालं आहे. चित्रपटात अजय देवगणने तान्हाजींची भूमिका साकारली असून सैफ अली खान उदयभान राठोडच्या भूमिकेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2020 1:27 pm