ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात अभिनेत्री तनुश्री दत्ताने अखेर पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. नाना पाटेकर यांच्यासह कोरिओग्राफर गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचादेखील तक्रारीत उल्लेख आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तनुश्रीने ही तक्रार दाखल केली.
२००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्रीने एका मुलाखतीत केला. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावत तिला कायदेशीर नोटीस बजावली होती.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तनुश्रीने आता थेट पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता चौकशीला सुरुवात केली असून यामुळे नाना पाटेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 6, 2018 10:47 pm