News Flash

या खेळावर आधारित ‘सूर सपाटा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

२२ मार्चपासून 'सूर सपाटा' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

'सूर सपाटा'

प्रत्येक श्वासागणिक बघणाऱ्यांचीही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा मातीतला खेळ म्हणजे ‘कबड्डी’. कबड्डी.. कबड्डी.. कबड्डी.. म्हणत साखळी मारणाऱ्या कबड्डीपटूसोबत सर्वसामान्यही त्यात गुंतत जातो. हाच मातीतला खेळ आज आंतरराष्टीय स्तरावर पकड घेताना दिसतोय. अशातच निर्माते जयंत लाडे आपल्या लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि या बॅनर अंतर्गत ‘सूर सपाटा’ हा मराठी चित्रपट घेऊन आले आहेत.

मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत चांगलीच रंगली असून चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत. शरद पवार आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते ‘सूर सपाटा’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. २२ मार्चला रंगणारा ‘सूर सपाटा’चा सामना अटीतटीचा होणार आहे हे नक्की.

वाचा : शाहरुखच्या ‘झिरो’वर भारी पडला KGF 

‘कबड्डी या आपल्या मातीतल्या दर्जेदार खेळाची महती ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याच्या अवाक्यावरून लक्षात येत आहे. जागतिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमधील वाढत्या स्पर्धा आणि स्पर्धकांची संख्या पाहता ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे,’ असे मत अजित पवार यांनी या प्रसंगी व्यक्त केले. चित्रपटाची कथा ही अशाच काही कबड्डीपटूंच्या अनुषंगाने फेर धरते. सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवण्यात शिक्षक यशस्वी होतात का? या मुलांचा एक सामान्य विद्यार्थी ते कबड्डीपटू म्हणून झालेला प्रवास किती जोखमीचा असेल? त्या मुलांच्या आयुष्यात कबड्डीमुळे होणारे बदल त्यांच्या आयुष्याला कुठली कलाटणी देतात? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.

अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन करलकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद ताबंडे आदींच्या प्रमुख भूमिका ‘सूर सपाटा’मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित ‘सूर सपाटा’च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंतांचा ताफा आमने-सामने येणार असून तूर्तास त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत. विशेष म्हणजे ‘सूर सपाटा’ला माजी कबड्डीपटू अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंचाही या चित्रपटात सक्रिय सहभाग यात रसिकांना पाहता येणार आहे. २२ मार्चपासून ‘सूर सपाटा’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 1:25 pm

Web Title: upcoming marathi movie sur sapata poster released based on kabbadi
Next Stories
1 Flashback 2018 : #MeTooच्या वादळात अडकलेले बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी
2 शाहरुखच्या ‘झिरो’वर भारी पडला KGF
3 आई-वडिलांपेक्षा रणवीर मला जास्त घाबरतो- दीपिका
Just Now!
X