News Flash

VIDEO : सलमान-अहिलची ‘ब्रेकफास्ट’ डेट

अहिलवर तर त्याचे जीवापाड प्रेम आहे.

सलमान खान, अहिल शर्मा

अभिनेता सलमान खानला लहान मुलं किती आवडतात, हे काही वेगळं सांगायला नको. त्याची बहिण अर्पिता खान शर्माचा चिमुकला अहिलवर तर त्याचे जीवापाड प्रेम आहे. आतापर्यंत हे दोघं मामा – भाचा खेळतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. इतकेच काय तर अहिलने आपल्या मामाला ठोसा मारल्याचा व्हिडिओही ‘सुलतान’च्यावेळी पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता सलमानने अहिलसोबत सकाळचा नाश्ता करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय. सध्या मामा-भाच्याची ही जोडी लंडनला आहे. येथील काही व्हिडिओ सलमानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वाचा : Revealed ‘टायगर जिंदा है’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘सुई धागा’, ‘संदीप और पिंकी फरार’ या दिवशी होणार प्रदर्शित

यापैकी पहिल्या व्हिडिओत सलमान आणि अहिल नाश्ता करताना दिसत आहेत. अहिल सलमानला घास भरवण्यासाठी हात पुढे करतो. मात्र, त्याला भरवण्याऐवजी नंतर लगेच हात मागे घेत तो स्वतःच खाताना दिसतो. अहिलची ही कृती पाहून सलमानला हसू आवरले नाही. तर दुसऱ्या व्हिडिओत सलमान आणि अहिल एकमेकांशी मस्ती करताना दिसतायत.

वाचा : सनी लिओनीला भाड्याने दिलेल्या घराचे वॉशरुम पाहून भडकली सेलेना जेटली

लवकरच सलमान ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. जवळपास पाच वर्षांनंतर सलमान आणि कतरिना कैफ ही जोडी आपल्याला रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘टायगर जिंदा है’चे दिग्दर्शन अली अब्बास जफर याने केलेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:22 pm

Web Title: video salman khans breakfast date with nephew ahil in landon
Next Stories
1 VIDEO : मद्यधुंद अवस्थेत मोदींविरोधात बरळला हा अभिनेता
2 ..आणि आजींनी तिच्यासोबत सेल्फी काढला
3 ‘रुद्रम’ ग्राफिकल मालिका स्वरुपात
Just Now!
X