News Flash

Viral Video: सिद्धार्थ शुक्लासारखा हुबेहूब दिसणारा आहे तरी कोण?

सध्या सोशल मीडियावर, सिद्धार्थ शुक्लासारख्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

sidharth shukla look a like
फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (फोटो:chandan53.cr/Instagram)

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे . अनेकजण आजही यातून बाहेर पडू शकत नाहीयेत. सिद्धार्थ शुक्लाचे चाहते इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर खूप सक्रिय आहेत आणि सतत त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. असाच एक चाहता अगदी त्याच्यासारखाच दिसतो आणि याच कारणाने तो लोकप्रिय झाला आहे. या चाहत्याच नाव चंदन असं आहे.

सिद्धार्थ शुक्लासारखा दिसणाऱ्या चंदनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चंदन हा देखील सिद्धार्थ शुक्लाचा चाहता आहे आणि बऱ्याच काळापासून त्याच्या स्टाईलची कॉपी करत आहे. चंदन लिपसिन्सिंगद्वारे सिद्धार्थचा व्हिडीओ देखील बनवतो. सिद्धार्थ शुक्लाचे अनेक चाहते चंदनला पसंती देत ​​आहेत आणि अनेकजण त्याला तसे न करण्यास सांगत आहेत. जुनिअर सिद्धार्थ शुक्ला अशी त्याची ओळख निर्माण होऊ लागली आहे. त्याचे इंस्टाग्रामवर १६ हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत.

चाहत्यांनी ‘अशा’ दिल्या प्रतिक्रिया

चंदनने सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलसोबत अनेक व्हिडीओही शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये चंदन त्याची कॉपी करत आहे, मात्र, अनेक चाहत्यांनी त्याला सिद्धार्थची कॉपी न करण्यास सांगितले आहे. त्यामुळे काही लोक त्याच्या व्हिडीओला हे बरोबर नाही असं देखील म्हणत आहेत. चंदन सिद्धार्थच्या ड्रेसिंग सेन्स आणि लूकचीही कॉपी करतो.

२ सप्टेंबरला झाले होते निधन

सिद्धार्थ शुक्ला यांचे २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. सिद्धार्थ शुक्ला फक्त ४० वर्षांचा होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chandan Wilfreen❤️

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 3:57 pm

Web Title: viral video who is this looks like siddharth shukla ttg 97
Next Stories
1 मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी दिलं जातंय कोंबडीच्या रक्ताचं इंजेक्शन
2 पठ्ठ्याने केली उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनसारखी हेअर स्टाईल; नेटकरी म्हणाले, “तू तर..”
3 Paytm च्या सीईओंनी केला सात तासांचा झूम कॉल; नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
Just Now!
X