प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. तो अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. त्यामुळे अनेकदा त्याच्यावर घराणेशाहीचे आरोप देखील केले जातात. परंतु गोविंदा आणि कृष्णामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. हे मतभेद इतक्या टोक्याचे आहेत की गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेंकासमोरही आलेले नाहीत. परंतु या मामा-भाच्यामधील भांडणाचं नेमकं कारण काय आहे?

अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर मराठी कलाकारांची टीका

२०१५ साली कृष्णानं एक मुलाखत दिली होती. “माझ्या मामानं मला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कुठलीही मदत केली नाही. स्वत: संघर्ष करुन मी माझं स्थान निर्माण केलं आहे.” असं कृष्णा या मुलाखतीत म्हणाला होता. मात्र त्याचं हे वक्तव्य गोविंदाला आवडलं नाही. “लोक केलेले उपकार इतक्या लवकर विसरतात.” असं म्हणत त्याने कृष्णाला प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून अनेकदा दोघांमध्ये शाब्दिक द्वंद्व रंगल्याचं प्रेक्षकांनी पाहिलं. या मतभेदांची आग कृष्णाची पत्नी कश्मीरामुळे आणखी वाढली. २०१८ मध्ये गोविंदाने एका शोच्या निर्मात्यांवर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. यावर “लोक पैशांसाठी कुठेही नाचतात” असं ट्विट कश्मिराने केलं होतं. हे ट्विट त्यावेळी खूप चर्चेत होतं. तेव्हापासून आजतागात गोविंदा आणि कृष्णा यांनी एकमेकांसोबत संभाषण केलेलं नाही.

अवश्य पाहा – १७ व्या वर्षी झाली होती मिस इंडिया; बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या काय करतेय?

कृष्णाला संपवायचयं भांडण

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कृष्णाने मामासोबत असलेल्या मतभेदांवर भाष्य केलं. तो म्हणाला, “चिची मामासोबत असलेले मतभेद आता मला संपवायचे आहेत. एका गैरसमजुतीमुळे आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. गेल्या काही वर्षांपासून मी मामासोबत माझं कुठलंही संभाषण झालेलं नाही. मामा कपिल शर्मा शोमध्ये आला तेव्हा मी गैरहजर होतो. खरं तर त्या शोमध्ये मला सुपरस्टार गोविंदाला ट्रिब्यूट द्यायचा होता. पण माझा एखादा विनोद मामाला आवडला नाही तर उगाच आणखी मतभेद होतील त्यामुळे मी शोमध्ये गैरहजर राहिलो. पण आता मी या भांडणाला कंटाळलो आहे. मला त्याच्यासोबत बोलायचं आहे. मला वाटतं कपिल शर्मा यासाठी मला मदत करु शकेल.”