News Flash

KGF Chapter 2 चा भन्नाट टीझर पाहिलात का? २०० मिलियन व्ह्यूज

१६ जुलै रोजी ‘केजीएफ चॅप्टर २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली

‘केजीएफ चॅप्टर – १’ हा चित्रपट ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे केजीएफ चॅप्टर 2 ची कथा सुरु होत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर १.’ तुफान यश आणि लोकप्रियता मिळालेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘केजीएफ चॅप्टर २’चा टीझर प्रदर्शित झाला होता. आता टीझरने २०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या वाढदिवसाची भेट म्हणून केजीएफ चॅप्टर 2 चा टीझर प्रदर्शित करणार होते. मात्र, प्रेक्षकांचे प्रेम आणि चाहत्यांकडून होत असलेल्या मागणीमुळे चित्रपटाचा टीझर एक दिवस आधीच प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरच्या सुरुवातीला रॉकीची आई आणि त्याचे बालपण दाखवण्यात आले आहे. त्याच्या आईने त्याला लहानाचे मोठे कसे केले आणि कोणत्या परिस्थितीत तो मोठा झाला, तसेच त्याने दिलेले वचन आता पूर्ण करण्याची वेळ आली असल्याचे दाखवण्यात आले आहे. टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता टीझरला यूट्यूबवर २०० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

१६ जुलै रोजी अभिनेता यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख अद्याप समोर आलेली नाही.

आणखी वाचा : ‘केजीएफ’ फेम यश मालदीवमध्ये कुटुंबीयांसोबत घेतोय सुट्ट्यांचा आनंद, पाहा फोटो

या टीझरमध्ये अभिनेत्री रविना टंडन झळकली असून या चित्रपटात ती एका राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच संजय दत्तचीदेखील झलक या टीझरमध्ये पाहायला मिळाली. तसेच सुपरस्टार यशदेखील त्याच्या दमदार स्टाइलमध्ये झळकला आहे.

‘केजीएफ चॅप्टर – १’ हा चित्रपट ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे केजीएफ चॅप्टर 2 ची कथा सुरु होत आहे. या सिक्वलमध्ये यशसोबत संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:03 pm

Web Title: yashs kgf chapter 2 teaser hits 200 million views on youtube avb 95
Next Stories
1 “मग जरा पेट्रोलच्या दरावर लिहा”; ‘त्या’ ट्वीटनंतर बिग बी अमिताभ बच्चन ट्रोल
2 “तुझे हात सापळ्यासारखे दिसतात” म्हणणाऱ्या ट्रोलरला छवि मित्तलचं उत्तर; म्हणाली “एक महिला असून…”
3 “शोच्या वेळी लोक विचित्र पद्धतीने स्पर्श करायचे”; कॉमेडियन भारती सिंहने शेअर केल्या ‘त्या’ कटू आठवणी
Just Now!
X