News Flash

सलमानच्या ‘राधे’ची खिल्ली उडवणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; चार लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज

सुप्रसिद्ध यूट्यूबर आदर्श आनंद याने 'राधे' चित्रपटावर स्पूफ व्हिडीओ बनवलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सलमान खानचा बहूचर्चित ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाची नकारात्मक समिक्षा केली म्हणून केआरके आणि अभिनेता सलमान खान यांच्यात सुरू झालेला वाद ताजा असतानाच आणखी नवा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाचा विनोद करण्यात आलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओला जवळजवळ चार लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सुप्रसिद्ध यूट्यूबर आदर्श आनंद याने ‘राधे’ चित्रपटावर स्पूफ वीडियो बनवलाय. यूट्यूबर आदर्श आनंदने आपल्या कमाल-धमाल अंदाजात ‘राधे’ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये या व्हिडीओमध्ये उरतवण्याचा प्रयत्न केलाय. नेहमीप्रमाणेच या व्हिडीला सुद्धा युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ जवळपास चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. आदर्श आनंदच्या टीममधील आपल्या बच्चे पार्टी लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करत आहेत. तसंच कमेंटमध्ये लोक आदर्श आणि त्याच्या टीमचं कौतुक करत आहेत.

या व्हिडीओमध्ये आदर्श आनंदने त्याच्या हातात ‘दबंग’ अभिनेता सलमान खानसारखाच ब्रेसलेट घातलेला दिसून आला. बिहारमधल्या एका छोट्याश्या गावात राहणारा आदर्श आनंद टिकटॉकमुळे चर्चेत आला होता. पण टिकटॉक बंद झाल्यानंतर त्याने हार मानली नाही आणि त्याने यूट्यूबवर विनोदी व्हिडीओ बनवून लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सुरवात केली.

याआधी आदर्शने ‘अंटी नंबर 1’ गाण्यावर व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओदेखील लोकांना प्रचंड आवडला होतो. आदर्शला भरपूर फोलोअर्स आहेत. त्याला यूट्यूबवर १.३० मिलियन पेक्षा जास्त लोकांनी फॉलो केलं आहे. आदर्श आनंदला डान्सिंग, सिंगिंग , कॉमेडी आणि मिमिक्रीची आवड आहे. त्याची ही आवड तो अशा व्हिडीओंमधून पूर्ण करत असतो. तसंच लोक सुद्धा त्याच्या व्हिडीओचा आनंद घेताना दिसून येत असतात. आतापर्यंत त्याने १५० पेक्षा जास्त लोकांची मिमिक्री केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 11:40 pm

Web Title: youtuber adarsh anand salman khan radhe spoof video on youtube prp 93
Next Stories
1 केदारनाथच्या सेटवर ड्रग्ज घेत होते सारा-सुशांत ?; नीतीश भारद्वाज यांनी दिलं हे उत्तर
2 रोडीजमध्ये स्पर्धकांचा अपमान करणाऱ्या रघु रामचा जेव्हा अपमान होतो…
3 “आमचं घर ही एक सामाजिक संस्था”, प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत
Just Now!
X