30 September 2020

News Flash

झी समूहाचा नवा म्युझिक चॅनेल; ‘झी वाजवा’ची जल्लोषात घोषणा

‘झी वाजवा’ वाहिनीची सुरूवात या ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील प्रतिष्ठित झी गौरव पुरस्कार २०२० मध्ये ‘झी’ने एका नवीन मराठी संगीत वाहिनीची घोषणा केली. ‘झी वाजवा’ असं या वाहिनीचं नाव आहे. या नवीन वाहिनीच्या लोगोचे अनावरण अभिनेता स्वप्निल जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

अतिशय जल्लोषात आणि सांगितिक माहौलमध्ये या वाहिनीच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. ‘झी वाजवा, क्षण वाजवा’ असं या वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे. प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा या वाहिनीचा उद्देश आहे.

झी वाजवा वाहिनीच्या प्रक्षेपण निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी या वाहिनीला अनेक शुभेच्छा दिल्या. झी वाजवा या वाहिनीच्या निमित्ताने मराठी गाण्यांसोबतच मराठी निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि मराठी चित्रपटांना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल याचं मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना स्वप्नील जोशीने व्यक्त केली. तसेच वाहिनीवर सादर होणाऱ्या गाण्यांमुळे मराठी गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यासाठी झी एक नवीन व्यासपीठ उलब्ध करून देतंय यासाठी सिद्धार्थ जाधव याने मनापासून ‘झी’ समूहाचं अभिनंदन केलं.

‘झी वाजवा’ वाहिनीची सुरूवात या ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 11:00 pm

Web Title: zee introduced new music channel zee vajava ssv 92
Next Stories
1 निर्मात्यांपुढे मराठी चित्रपटनिर्मितीचा मोठा प्रश्न- अक्षय बर्दापूरकर
2 दिलदार बाहुबली! जिम ट्रेनरला दिली मोठी भेट
3 व्यापाऱ्यांचा कंगनाला असाही पाठिंबा; बाजारात आणली ‘कंगना साडी’
Just Now!
X