काही अभिनेते आपल्या अभिनयासाठी, तर काहीजण स्टाईलसाठी ओळखले जातात. अभिनेता सोनू सूद त्याच्या अभिनयापेक्षा आता सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. संपूर्ण करोना काळात त्यानं ज्याप्रकारे देशभरातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली त्याचं सर्वत्र कौतुक झालं आहे. सोनूने त्याकाळात स्वखर्चाने लाखो कामगारांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवले. त्याच्या या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक झाले. २०२२ वर्ष संपत असताना त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

सोनू सूद सामाजिक कार्याच्या बरोबरीने तो सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. आपल्या कामाबद्दलची माहिती तो ट्विटर शेअर करत असतो. नुकतेच त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक ट्वीट केलं आहे ज्यात तो असं म्हणाला की, “मागच्या वर्षी १०११७ लोकांना वाचवण्यात आणि निरोगी ठेवण्यात समर्थ ठरलो. ज्या लोकांपर्यत पोहचू शकलो नाही अशा लोकांची माफी मागतो. २०२३मध्ये सर्वोत्तम राहण्यासाठी देव आपल्याला आणखीन शक्ती देवो, २०२३ वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा,” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनू यावर्षी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात दिसला होता. सोनू सूद मूळचा पंजाबी असून त्याने आपले शिक्षण नागपूर येथून केले आहे. तामिळ चित्रपटातून त्याने अभिनय करण्यास सुरवात केली. ‘जोधा अकबर’, ‘युवा’, ‘आशिक बनाया आपने, यांसारख्या हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे.