68th National Film Awards Winners : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता. दरम्यान यंदाच्या पुरस्कारांमध्ये कोणकोणते कलाकार किंवा चित्रपट बाजी मारणार याविषयी खूप उत्सुकता आहे.
68th National Film Awards : ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे सर्व अपडेट वाचा एकाच क्लिकवर
मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
'तान्हाजी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार; अजय देवगण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
सुमी
दिग्दर्शक- अमोल गोळे
फनरल (मराठी)
विवेक दुबे
अभिनेता - अजय देवगण
चित्रपट- तानाजी : द अनसंग वॉरियर
अनिश गोसावी
चित्रपट- टकटक
आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर
चित्रपट- सुमी
मनोज मुंतशीर
चित्रपट- सायना
राहुल देशपांडे
चित्रपट - मी वसंतराव
तानाजी : द अनसंग वॉरियर
निर्माता- अजय देवगण
दिग्दर्शक- ओम राऊत
गोष्ट एका पैठणीची
दिग्दर्शक- शांतनू रोडे
जून (मराठी)
अभिनेता- सिदार्थ मेनन
गोदाकाठ (मराठी)
अवांचित (मराठी)
अभिनेता- किशोर कदम
चित्रपटांसाठी सर्वाधिक पसंती मिळालेलं राज्य- मध्यप्रदेश
चित्रपटांसाठी सर्वाधिक पसंती मिळालेलं राज्य- मध्यप्रदेश
चित्रपटांसाठी सर्वात अनुकूल राज्य-
मध्यप्रदेश
नवी दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमधून ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणेला सुरुवात झाली आहे. हे पुरस्कार ५ वेगवेगळ्या विभागात दिले जातात.
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत ‘सरदार उधम सिंग’, ‘शेरशहा’, ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘शेरनी’ हे चित्रपट असल्याचं बोललं जात आहेत. याशिवाय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' देखील या शर्यतीत असणार आहे.
मागच्या वर्षी म्हणजेच ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयीला 'भोसले' सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषलाही त्याच्या 'असुरन' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री कंगना रणौत यांना ४ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांना 'अग्निपथ', 'ब्लॅक', 'पा' आणि 'पिकू' या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर कंगनाला 'फॅशन', 'क्वीन', 'तनु वेड्स मनु' आणि 'मणिकर्णिका' या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांना आतापर्यंत सर्वाधिक ५ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या 'अंकुर' (१९७४) , 'अर्थ' (१९८२), 'खंडर' (१९८४), 'पार' (१९८४) आणि 'गॉडमदर' (१९९९) या चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्या वर्षी पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार 'शामची आई' या चित्रपटाला देण्यात आला होता.
यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत ट्विटर पेजवरून देण्यात आली आहे.
मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला संध्याकाळी ४ वाजता केली जाणार आहे.