71st National Film Awards 2025 Winners : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा १ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. आज ( २३ सप्टेंबर ) या सर्व विजेत्यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं
कलाकार व तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. भारतात १९५४ पासून राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली होती. यंदा शाहरुख खानला तब्बल ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रांत मॅसी आणि शाहरुख खान यांना विभागून देण्यात आला आहे. तर, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. यासह यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आहे.
71st National Film Awards Ceremony Updates -
71st National Film Awards : मोहनलाल यांचा सन्मान
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
'द केरला स्टोरी' सिनेमासाठी सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान ( जवान )
३३ वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुख खानला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट अभिनेता - विक्रांत मॅसी
विक्रांत मॅसीला 12th Fail सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार शाहरुख आणि विक्रांत यांना विभागून देण्यात आला आहे.

71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या सिनेमासाठी प्रदान करण्यात आला आहे.

71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजयराघवन ( पूक्कलम ) आणि मुथुपेटाई सोमू भास्कर ( पार्किंग )
71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी ( उल्लोझुक्कू ) आणि जानकी बोडीवाला ( वश )
71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट बालकलाकार - कबीर खंडारे ( जिप्सी )

71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट बालकलाकार - त्रिशा ठोसर ( नाळ २ )


71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट बालकलाकार
71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट बालकलाकार - भार्गव जगताप ( नाळ २ )
71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – शिल्पा राव ( Chaliya- जवान )

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – प्रशांतनु महापात्रा ( द केरला स्टोरी )
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक
'सिर्फ एक बंदा काफी है'साठी दीपक किंगराणी यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट पटकथा – साई राजेश नीलम ( बेबी ) तेलुगू सिनेमा
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईनचा पुरस्कार मोहनदास ( २०१८ ) यांना प्रदान करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट Odia चित्रपट – पुष्करा
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – भगवंत केसरी
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – वश
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – कंदीलू- द रे ऑफ होप
आसामी चित्रपट – रोंगाटापू 1982
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टचा पुरस्कार मराठमोळ्या श्रीकांत देसाई यांना सॅम बहादूर सिनेमासाठी प्रदान करण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ठरला आहे पीव्हीएम एस रोहित
71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शन
सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शन – हनु-मॅन (तेलुगू)
71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट वेशभूषा
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सचिन लोवळेकर, दिव्या आणि निधी गंभीर ( सॅम बहादूर )
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार वाथी या तामिळ सिनेमाला प्रदान करण्यात आला आहे.
71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – Animal Movie हर्षवर्धन रामेश्वर
सर्वोत्कृष्ट संपादन -मिधुन मुरली ( पुक्कलम )
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधीस धिंडोरा बाजे गाण्यासाठी- वैभवी मर्चंट

71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट ठरला आहे उल्लोझुक्कू
71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट ठरला आहे डीप फ्रिज
71st National Film Awards Updates: सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री
कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्रीला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे श्यामची आई

सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट
सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपटाचा पुरस्कार पार्किंग सिनेमाला प्रदान करण्यात आला आहे.
71st National Film Awards Full List Of Winners : ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये शाहरुख खान व राणी मुखर्जी यांचा सन्मान